इंधनांच्या किमतीत होणारी अमर्याद वाढ, जगाची बदलणारी भू-राजकीय स्थिती व आर्थिक अनिश्चितता या सर्व परिस्थितीमध्ये शाश्वत उत्पादनांची निर्मिती व भावी पिढ्यांसाठी आपली पृथ्वी संरक्षित ठेवण्याचीही गरज व्यक्त केले जाते आहे. आज सर्वत्र सुरू असलेल्या या वस्तूंच्या अमर्याद वापरामुळे मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे व त्यातून लवकरच आपली नैसर्गिक संसाधने वेगाने कमी होणार आहेत. ऊर्जेच्या वाढत्या गरजेमुळे पेट्रोकेमिकल आणि केमिकल उद्योगांना एका महत्त्वाच्या टप्प्यावर आणून सोडले आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि अद्ययावत अॅनालिटिक्सचा वापर करून उत्पादनक्षमता परमोच्च बिंदूपर्यंत आणणे व त्यातून उद्योगांतील मोठ्या प्रकल्पांतील उत्पादन वाढवून संपत्तीची निर्मिती करण्यावर भर दिला जातो आहे.
विविध पेट्रोलियम उत्पादनांच्या तुलनेत सौरऊर्जेसारखे अक्षय ऊर्जा उत्पादने पुरेसे स्वस्त नाहीत व त्यातून मोठ्या प्रमाणावर गरज भागविणारे प्रकल्प उभारणे परवडणारे नाही. अर्थात, त्यांचा उपयोग काही पारंपरिक पेट्रोकेमिकल उत्पादनांमध्ये केला जाऊ शकतो. उदा. सौर ऊर्जेचा वापर कच्च्या तेलाच्या शोध घेताना लागणाऱ्या ऊर्जेसाठी करणे व जिओ-थर्मल इंजिनिअरिंगच्या ज्ञानामध्ये सौर ऊर्जेक्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून घेणे.
याच्या जोडीला पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग क्षेत्राचा उपयोग शाश्वत उपाय शोधणाऱ्या अनेक उद्योगांसाठी वापरता आणता येऊ शकतो. यामध्ये ऊर्जा वाचविण्यासाठीचे इन्शुलेशन मटेरिअल, मोठ्या काळासाठी टिकून राहणाऱ्या कमी वजनाच्या स्मार्ट फोनची व टॅब्लेट कॉम्प्युटर्सची निर्मिती, अत्याधुनिक इंधनांचा पारंपरिक इंधनात वापर करून वाहतुकीदरम्यान होणारे कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, पवनऊर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या पंख्यांच्या पात्यांमध्ये किंवा सोलर पॅनलमध्ये या क्षेत्राचा नक्कीच मोठा उपयोग होऊ शकतो.
अशा प्रकारे पेट्रोलिअम क्षेत्रात तज्ज्ञांची मोठी गरज लागणार असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या नैपुण्य व क्षमतांमध्ये या क्षेत्राच्या गरजेनुसार मोठी वाढ करणे अनिवार्य असेल. त्याचप्रमाणे त्यांना आजच्या मागणीनुसार स्वतःमध्ये बदलही घडवून आणावे लागतील. परदेशात केमिकल किंवा पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमधील अंडरग्रॅज्युएट डिग्री मिळवून विद्यार्थी पदवी कार्यक्रम निवडून आपल्या कौशल्यांमध्ये वाढ करू शकतात. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधील आपली क्षमता वाढवून व उच्च दर्जाच्या लॅंग्वेजेस (सीएस १०६एक्स व त्या समकक्ष) व त्याचबरोबर एनर्जी रिसोर्सेस इंजिनिअरिंग व जिओलॉजीतील मूलभूत ज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक ठरते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.