Study Sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशात शिकताना... : तांत्रिक अभ्यासक्रमांसाठीची स्पर्धा वाढतच जाणार...

यशाची खूप मोठी खात्री असल्याने बहुतांश तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी तगडी स्पर्धा असते.

राजीव बोस

यशाची खूप मोठी खात्री असल्याने बहुतांश तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी तगडी स्पर्धा असते. यामध्ये शैक्षणिक व आर्थिक यशाबरोबरच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कंपनीत मोठे पद मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्याचबरोबर ही गोष्टी अत्यंत महत्त्वाची आहे, की तंत्रज्ञान आता समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोचले आहेत. स्मार्ट उपकरणे आणि स्मार्ट फोन आता दैनंदिन आयुष्याचा भाग बनले आहेत. अनेक विद्यार्थी पदवी मिळवण्यापूर्वीच आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रावीण्य आहे, हे जाणतात व त्याचबरोबर त्यांचे करिअरमधील ध्येय काय आहे हेही त्यांनी निश्‍चित केलेले असते. याच्या जोडीला कोणत्या क्षेत्रात सखोल अभ्यास करून आपले कौशल्य वाढवावे, हेही त्यांनी जोखलेले असते. उदाहरणच द्यायचे, तर कॉम्प्युटर सायन्समधील पदवीधारकाला १५ विशेष क्षेत्रांमधून निवड करण्याची संधी मिळते. यामध्ये अर्टिफिशिअल इंटेलिजन्स, गेम डिझाईन, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, डेटा सायन्स, इन्फर्मेशन सिस्टिम, सायबर सिक्युरिटी अशा अनेक क्षेत्रांचा समावेश होता.

आपण सध्या दररोजच्या वापरातील आणि व्हर्च्युअल उपकरणांचा मोठा प्रसार झालेला पाहतो आहेत. त्यांद्वारे आपल्याला आवश्‍यक सेवा मिळतातच, त्याचबरोबर त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होते. या डेटाचा उपयोग कन्झ्युमर मार्केट आणि ट्रेंड समजून घेण्यासाठी उपयोगाचा ठरतो. जसजसे अधिकाधिक लोक इंटरनेटचा वापर करू लागतील, तसे तंत्रज्ञान सर्व वयोगटांतील युजर्स व व्यावसायिकांना वापरण्यास सुलभ होण्याची गरज वाढतच जाईल. त्यामुळे आकर्षक डिझाईन, अद्ययावत तंत्रज्ञान वापरणाऱ्याला समृद्ध करणारा अनुभव देणे या मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव वाढतच जाईल. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या इंजिनिअर्सना भविष्यात मोठी मागणी असेल. अमेरिकेतील अनेक विद्यापीठे विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय घेऊन पुढे येत असून, त्यामध्ये शिक्षणाबरोबर संशोधनाच्या आधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी दिसत असून, मोठे उद्योगसमूह अशा विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत. त्यामुळे मागणी व पुरवठ्याचे हे गणित जुळल्यास विद्यार्थ्यांना परदेशात बड्या पगाराच्या संधी नक्कीच चालून येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

SCROLL FOR NEXT