ramayana and Mahabharata sakal
एज्युकेशन जॉब्स

महाभारताचे समग्र दर्शन

रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत.

सकाळ वृत्तसेवा

रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. नव्या पिढीच्या मनातही या ग्रंथांबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे. हे औत्सुक्य शमवण्यासाठी महाभारतावरील व्याख्याने हे पुस्तक तुमची नक्कीच मदत करू शकेल.

१९५१ मध्ये साहित्यचार्य बाळशास्त्री हरदास यांची पुण्यामध्ये महाभारतावरील व्याख्याने फार गाजली होती. त्यामुळे खास लोकाग्रहास्तव ही व्याख्याने ग्रंथ स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली.

आपल्या इतिहासाचे सार समजावून घेत, त्यातील उत्कटता आपल्या अंगी भिनवण्याचा आणि पूर्वसुरींकडून जर काही चुका झाल्या असतील, तर त्या सुधारण्याचा दृष्टिकोन फार कमी जणांनी ठेवला. हा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न बाळशास्त्री हरदास यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

हरदास यांचा भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा यथार्थ अभ्यास असल्या कारणाने पाश्चात्य अभ्यासकांनी किंवा त्यांच्या प्रभावाखाली आलेल्या आपल्याकडील अभ्यासकांनी कोणत्या दृष्टिकोनातून महाभारताकडे पाहिले आहे, त्यातील योग्य मुद्दे कोणते; उणिवा कोणत्या याबद्दल? हरदास यांनी परखडपणे मांडली आहेत.

हे पुस्तक महाभारताच्या घटनाक्रमाचे वर्णन करणारे नसून, त्यातील महत्त्वाच्या पात्रांना प्रधान मानत मूळ महाभारतातील वर्णनाच्या आधारे आजच्या संदर्भात महाभारताचे आकलन करून देणारे आहे.

महाभारत म्हणजे केवळ एका कुटुंबातील वाद अशी अनेकांची समजूत झाली आहे. मात्र, महाभारत म्हणजे तत्कालीन राजसत्तेमधील अस्थिरतेचे आणि त्या अनुषंगाने घडत गेलेल्या घटनांचे वर्णन आहे. त्यामुळे हरदास यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी तत्कालीन भारतीय राजसत्तांची परिस्थिती आणि त्यांचे मूळ स्वरूप कसे अपेक्षित होते यावर प्रकाश टाकला आहे. त्यानंतर महाभारतातील प्रमुख व्यक्तीरेखांच्या आधारे पुढील मांडणी करण्यात आली आहे.

विशेष आकर्षण म्हणजे,कर्णाबद्दल मूळ महाभारतात असलेले उल्लेख हरदास यांनी साधार दिले असल्याने कादंबऱ्यांच्या माध्यमातून आपल्या माहित झालेल्या कर्णापेक्षा वेगळा आणि मूळ महाभारतातील वर्णन असलेला कर्ण वाचायला मिळतो. एकुणात मूळ ग्रंथातील वर्णनाच्या आधारे महाभारताची उकल करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.

कोणत्याही ऐकीव कथा, चित्रपट किंवा मालिका यांच्या आधारे महाभारत समजावून घेण्याऐवजी मूळ महाभारत वाचल्याने त्याचे इंगित अधिक स्पष्टपणे समजू शकेल आणि ते समजावून घेताना बाळशास्त्री हरदास यांचा हा ग्रंथ आपल्याला अधिक मदत करू शकेल.

(संकलन - रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT