ESIC esakal
एज्युकेशन जॉब्स

ESIC करतेय 1120 ग्रेड 2 पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

ESIC करतेय 1120 ग्रेड 2 पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

सकाळ वृत्तसेवा

एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये (ESIC) सरकारी नोकरी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे.

सोलापूर : एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये (Employees State Insurance Corporation - ESIC) सरकारी नोकरी (Government Jobs) शोधणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (Employees State Insurance Corporation), श्रम आणि रोजगार मंत्रालय (Ministry of Labor and Employment), भारत सरकार (Government of India) अंतर्गत देशभरात कार्यरत असलेल्या विविध रुग्णालये (Hospital) आणि दवाखान्यांमध्ये 1120 ग्रेड 2 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, ग्रेड 2 च्या विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) च्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यापैकी 459 पदे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत, तर 303 पदे ओबीसी, 158 एससीसाठी, 88 एसटीसाठी आणि 112 ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी राखीव आहेत. (Recruitment of Grade 2 posts in Employees State Insurance Corporation)

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. ESIC 1120 पोस्ट भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 31 डिसेंबर 2021 पासून सुरू होईल आणि उमेदवार 31 जानेवारी 2022 पर्यंत त्यांचा अर्ज सबमिट करू शकतील. अर्जादरम्यान उमेदवाराला 500 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून भरू शकतील. तथापि SC, ST, दिव्यांग, माजी कर्मचारी, महिला आणि विभागीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क फक्त रुपये 250 आहे.

जाणून घ्या पात्रता

ESIC ने 1120 पदांच्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (Medical Council of India) मान्यता दिलेल्या संस्थेतून MBBS पदवीधारक असणे आवश्‍यक आहे. तसेच, 31 जानेवारी 2022 रोजी उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना केंद्राच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक तपशिलासाठी आणि भरतीच्या इतर तपशिलांसाठी ESIC भरती 2021 ची अधिसूचना पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT