एनआयएमध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी चालून आली आहे.
सोलापूर : एनआयएमध्ये सरकारी नोकरी (Government Jobs) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या (Government Of India) आयुष मंत्रालयाच्या (Ministry Of AYUSH) अंतर्गत राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (National Institute Of Ayurveda - NIA) ने विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. संस्थेद्वारे भरती अधिसूचनेनुसार मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff - MTS), निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk - LDC), ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant), कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Junior Medical Laboratory Technician), कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) (हिंदी) (Hindi) च्या एकूण 18 पदांसाठी आणि पंचकर्म वैद्यच्या (Panchkarma Vaidya) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की NIA भरती 2021 अंतर्गत या सर्व पदांवर नियमितपणे थेट भरती केली जाणार आहे.
असा करा अर्ज
NIA भरती 2021 साठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाइट nia.nic.in वर दिलेल्या थेट लिंकवरून अधिसूचना डाउनलोड करू शकतात. अर्ज करण्यासाठी फॉर्मची लिंक भरती अधिसूचनेतच दिली आहे. हा अर्ज पूर्णपणे भरा आणि पोस्टनुसार आवश्यक कागदपत्रे आणि विहित अर्ज शुल्काचा डिमांड ड्राफ्ट जोडा व डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जोरावर सिंह गेट, अजमेर रोड, जयपूर - 302002 (राजस्थान) येथे सबमिट करा. उमेदवारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत म्हणजेच 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सबमिट करावे लागतील.
अर्जाच्या शेवटच्या तारखेपासून वयाची गणना केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. अधिक तपशिलांसाठी NIA भरती 2021 अधिसूचना पाहा.
रिक्त पदे, अर्जाचे शुल्क, पात्रता व वयोमर्यादा
पंचकर्म वैद्य : 1 पद; रु. 3500; एमडी (आयुर्वेद) आणि वयोमर्यादा 40 वर्षे आहे.
कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 1 पद; 2000 रुपये; बारावी पास आणि वयोमर्यादा 28 वर्षे.
ज्युनिअर स्टेनोग्राफर (हिंदी) : 1 पद; 2000 रुपये; विज्ञान विषयात बारावी पास, DMLT आणि वयोमर्यादा 28 वर्षे.
ग्रंथालय सहाय्यक : 1 पद; 2000 रुपये; दहावी उत्तीर्ण, ग्रंथालय विज्ञानातील प्रमाणपत्र आणि वयोमर्यादा 30 वर्षे आहे.
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) : 3 पदे; 2000 रुपये; बारावी पास आणि वयोमर्यादा 27 वर्षे.
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 11 पदे; 2000 रुपये; दहावी पास आणि वयोमर्यादा 25 वर्षे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.