Government Job google
एज्युकेशन जॉब्स

Government Job : १३ हजार तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इथे होणार मोठी भरती

उर्वरित भरती शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या पदांसाठी आहे. त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

नमिता धुरी

मुंबई : केंद्रीय विद्यालय संघटना (KVS)ने अध्यापन आणि अशैक्षणिक पदांसाठी 13,404 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षक, टीजीटी, पीजीटी आणि संगीत शिक्षक, प्राचार्य आणि उपमुख्याध्यापक या पदांसाठी 11 हजार 744 जागा रिक्त आहेत.

उर्वरित भरती शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या पदांसाठी आहे. त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेअंतर्गत सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, TGT,PGT,PRT,ग्रंथपाल, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, हिंदी अनुवादक आणि लघुलेखक या पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल.

उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. तुम्ही केंद्रीय विद्यालय संघटना भरती 2022 साठी 5 डिसेंबर 2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता. या भरतीसाठी 12वी पास देखील अर्ज करू शकतात.

रिक्त जागांचा तपशील

एकूण : 13404 पदे

शिक्षकांच्या पदांवर रिक्त जागा

एकूण रिक्त जागा – 11744

प्राथमिक शिक्षक - 6414

TGT- 3176

PGT - 1409

प्राथमिक शिक्षक संगीत - 303

उपप्राचार्य - 203

प्राचार्य - 239

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा

एकूण- 1649

सहाय्यक आयुक्त - 52

स्टेनोग्राफर ग्रेड II – 54

ग्रंथपाल - 355

वित्त अधिकारी - 6

सहाय्यक अभियंता - 2

सहाय्यक विभाग अधिकारी - 156

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक - 322

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक-702

अर्ज शुल्क

या भरती प्रक्रियेसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तुम्ही अर्जाची फी ऑनलाइन भरू शकता.

कुठे अर्ज करायचा

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील.

वय श्रेणी

या भरती प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच काही श्रेणींसाठी वयातही सूट देण्यात आली आहे.

PGT साठी - कमाल वय 40 वर्षे

TGT आणि ग्रंथपालांसाठी - कमाल वय 35 वर्षे

PRT साठी - कमाल वयोमर्यादा 30 वर्षे

पात्रता

PRT - 12वी पास आणि D.Ed/JBT/B.Ed. उमेदवाराकडे CTET प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

TRT - पदवी आणि B.Ed. उमेदवाराकडे CTET प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पीजीटी - पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी.एड. उमेदवाराकडे CTET प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

प्रक्रिया

KVS Recruitment 2022 साठी, उमेदवारांना लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत प्रक्रियेतून जावे लागेल. यानंतर उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. उमेदवार निवडल्यास ते निवडीच्या सुरुवातीच्या पोस्टिंगवर भारतात कुठेही पोस्ट केले जाऊ शकतात.

असा करा अर्ज

सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

नंतर KVS भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

आता अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

यानंतर आता फॉर्म भरा.

आता कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

त्यानंतर अर्जाची फी जमा करा.

आता फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT