अगं काल दीपिका पदुकोणला पाहिलेस का? किती सुंदर ड्रेस होता तिचा! आणि रणवीर सिंगने तर किती कलरफुल ड्रेसिंग केलं होत ना! ही अशी वाक्ये आपल्या कानावर कायम पडत असतात. पण जे समोर दिसते त्या मागचे खरे शिल्पकार आहेत तरी कोण? तर ते आहेत फॅशन डिझायनर्स.
फॅशन डिझायनिंग हे आजच्या जगातील सर्वांत क्रिएटिव्ह, ग्लॅमरस, रोमांचक करिअर आहे. फॅशन डिझायनर बनण्यासाठी भरपूर संयम, चिकाटी, कठोर मेहनत घ्यावी लागते. भरभराटीच्या फॅशन उद्योगाने जगभरातील प्रशिक्षित फॅशन डिझायनर्सची मागणी वाढली आहे.
भारतातील अव्वल फॅशन डिझायनिंग संस्था विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसाठी प्रशिक्षण देत आहेत. यशस्वी पदवीधर फॅशन डिझायनर, टेक्स्टाईल डिझायनर, व्हिज्युअल मर्चंडाइजर्स, फॅशन्स मार्केटर्स इत्यादी बनू शकतात. पदवी, पदव्युत्तर आणि अल्पकालीन अभ्यासक्रम विविध संस्थांद्वारे दिले जातात. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्यापाराच्या युक्त्या शिकण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करतात. हे त्यांना मूळ डिझाइन तयार करण्याचे, नवीन फॅशन ट्रेंडची संकल्पना तयार करण्याचे आणि नावीन्यपूर्ण विचार करण्याचे प्रशिक्षण देतात.
शिक्षणाच्या संधी
भारतातील टॉप फॅशन डिझायनिंग संस्था वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम चालवतात. व्यावसायिक फॅशन डिझायनर होण्यासाठी डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट, पोस्ट-ग्रॅज्युएट आणि विकएण्ड क्लासेस करता येतात. कोर्ससाठी मूलभूत पात्रता १०+२ आहे, ती निवडलेल्या कोर्सनुसार बदलते. संस्था आणि आवडीच्या क्षेत्रानुसार, आपण अनेक अभ्यासक्रमांमधून निवडू शकता.
येथे नोकरी मिळेल
Shoppers Stop, Raymonds, Arvind, Cotton king, Pantaloon, Globus,W, Biba, Petter England, Levis, Amazon, Snapdeal, Myntra, Ajio, Sabyasachi Mukherjee, Rohit Bal, Manish Malhotra, Rahul Mishra इत्यादी.
लोकप्रिय करिअरची यादी
Fashion Designer/Assistant Designer
Fashion Show Organizers
Technical Designer, Fashion Consultant
Fashion Concept Manager
Fashion Marketer
Quality Controller
Fashion Coordinator
Costume Designer
Fashion Consultant
Fashion Forecaster
Fashion Entrepreneur
Fashion Stylist
Fashion Photographer
Production Supervisor
Fashion Merchandiser
Quality Supervisor and Costume designer
Pattern Designer
Pattern Maker
Fashion Illustrator व Fashion Design lecturer/professor.
कोर्सेसची यादी
Diploma in Dress Designing and garment manufacturing
Diploma in Fashion Design and Construction
B. Sc in Fashion and Apparel Designing
B. Sc in Fashion Business and Retail Management
B. Des (Fashion Design)
B. Des (Textile Design)
B. Des (Leather Design)
B. Des (Knitwear Design)
B. Des (Apparel Production)
B. Des (Fashion Communication)
B. A. (Hons) Fashion Design
B. A. (Hons) Fashion Styling and Image Design
B. A. (Hons) Communication Design
MBA in Fashion Merchandising and Retail Management
MBA in Fashion Design and Business Management
MBA in Textile Management
M.Sc. in Fashion Designing
M. Des Fashion Designing
M. Des Textile Designing
फॅशन डिझायनिंग कॉलेजेस
National Institute of Fashion technology (NIFT)
National Institute of Design (NID)
Amity Institute of Fashion technology
Pearl academy
Arch academy of design
MGM Institute of fashion design
School of Fashion technology (SOFT)
Symbiosis Institute of Design
MIT Institute of Design
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.