Railway Recruitment 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल ९,००० जागांसाठी पदभरती

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया जारी केली आहे. ही भरती एकूण ९ हजार जागांसाठी असणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Railway Recruitment 2024 : जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी नोकरी शोधत असाल, तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. जर तुमच्याकडे यासाठी आवश्यक असणारी पात्रता असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तरूणांसाठी टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ही (RRB) टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया जारी केली आहे. ही भरती एकूण ९ हजार जागांसाठी असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख मात्र, अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

रेल्वेतील या टेक्निशियन पदांसाठी एकूण ९००० जागांवर ही भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये म्हणजे याच महिन्यात सुरू होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मात्र, मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.

हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर (indianrailways.gov.in) भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि अपडेट्स जाणून घेऊ शकता.

या पदांसाठी आवश्यक पात्रता काय?

या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच ITI उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या शिवाय, इच्छुक उमेदवाराकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा

आता वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेतील या तंत्रज्ञान (टेक्निशियन) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ असावे तर कमाल वय हे ३३ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी केली जाणार?

रेल्वेतील या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागणार आहे. CBT1 उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला त्यानंतर CBT2 परिक्षेत सहभागी होता यईल.

या CBT2 परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराला वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल. हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पडल्यानंतर उमेदवाराला गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT