rte admission scam student future and parents enquiry fake documents education Sakal
एज्युकेशन जॉब्स

RTE Admission Scam : शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात !

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आरटीई घोटाळ्याच्या एका वर्षातील चौकशीत १९ बोगस प्रवेश समोर आलेत. याप्रकरणी १९ पालकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. एकाच वर्षात १९ पालक गोत्यात आले असताना, गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने शाहीद शरीफ याने शेकडो पालकांचे प्रवेश करून दिल्याने अनेक वर्षांपासून सुरू असून सखोल चौकशी झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात येणार असून पालकही अडचणीत येणार असल्याचे सागंण्यात येते.

आरटीई अंतर्गत नामांकित खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येते. यासाठी शासनाने काही नियम घातले आहेत. मागासवर्ग घटक वळगता इतरांसाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे पालकाचे घर शाळेच्या तीन किमीच्या आत असणे आवश्यक आहे. परंतु बोगस कागदपत्रांच्या आधारे याचा फायदा आर्थिक सबळ व्यक्ती घेत असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले.

अनेक पालकांनी बोगस भाडेकरारपत्र करीत शाळेच्या तीन किलोमीटरच्या आत राहात असल्याचे दाखवले. प्रत्यक्षात हे पालक पत्त्यात राहत नसून काही उत्पन्नाचे दाखले ही खोटे दिल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाल्या. त्या आधारे शिक्षण विभागाकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

कामठी तालुक्यात तीन, मौदा तालुक्यात एक व नागपूर ग्रामीण तालुक्यात चार प्रवेश बोगस आढळले. त्यातील मौदा तालुक्यातील एक प्रवेश रद्द करण्यात आला आहे. नागपूर शहरात १९ प्रवेश बोगस कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचे समोर आले.

शिक्षण विभागाच्या तक्रारीच्या आधारे १९ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर दोघांना अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार असलेल्या शाहिद शरीफ याच्यावर तीन ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातीलच कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तर आरटीई अंतर्गत गेल्या १४ वर्षांपासून प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार गेल्या सात-आठ वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बोगस प्रवेशाचा आकडा शेकडोच्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

Savner Assembly Elections 2024: रामटेक वगळता ग्रामीणमधून ‘लिफाफे' बंद; भाजपाचा नवा पॅटर्न !

By-Elections 2024: 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 संसदीय मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

Latest Maharashtra News Updates : मविआची १७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद; जागा वाटप जाहीर होणार

SCROLL FOR NEXT