Success_Samiya_Naseem 
एज्युकेशन जॉब्स

Success Story: गोरखपूरच्या सामियाने अमेरिकेत फडकवला भारताचा झेंडा; बनली शिकागोची न्यायाधीश

सकाळ डिजिटल टीम

Success Story: नवी दिल्ली : गोरखपूरमधील गीताप्रेस रोड भागात राहणारी सामिया नसीम अमेरिकेत न्यायाधीश बनली आहे. सामियाने गेल्या वर्षी २० डिसेंबरला शिकागोमधील न्याय विभागाच्या मुख्य इमारतीत झालेल्या एका खास समारंभात न्यायाधीश पदाची शपथ घेतली.

ऑक्सफोर्डमध्ये घेतले शिक्षण 
न्यायाधीश होण्यापूर्वी तिने अमेरिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. २००१ मध्ये वॉशिंग्टनच्या सिमन्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर २००४ मध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ लॉ स्कूलमधून ज्युडिस डॉक्टरेट पूर्ण केली. याव्यतिरिक्त, सामियाने यूकेच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा आणि निर्वासित कायद्याचा (रिफ्यूजी लॉ) अभ्यास केला. सामियाच्या या कर्तृत्वाने गोरखपूरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. लेखक तन्वीर सलीम, सर्जन डॉ. खालिद अब्बासी आणि अभियंता अख्तर हुसेन यांनी पूर्वांचलच्या मुली देश आणि जगात नाव कमवत आहेत, अशी प्रतिक्रिया नोंदवली.

वकील म्हणूनही केले काम
अॅटर्नी जनरल विल्यम बर यांनी शिकागो इमिग्रेशन कोर्टासाठी इमिग्रेशन न्यायाधीश म्हणून सामियाची नियुक्ती केली. २०१० ते २०१९ पर्यंत सामियाची कारकीर्द खूप चांगली राहिली. तिने न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये मुख्य वकील, इमिग्रेशन आणि कस्टम विभाग, होमलँड सुरक्षा विभागाच्या कार्यालयात मुख्य सहायक सल्लागार म्हणून काम केले.

न्यूयॉर्कच्या स्टेट बारची सदस्य 
२००७-२०१० दरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील न्याय विभागात ट्रायल अॅटर्नी म्हणून काम पाहिले. २००५-२००७ दरम्यान तिने बॉयलास्टन, मॅसेच्युसेट्समधील कायदा कार्यालयात वकील म्हणूनही काम पाहिले. सुरवातीला म्हणजे २००४-२००५ मध्ये वॉशिंग्टनमधील प्रसिद्ध वकील जूडिथ एन मॅकलुसोची क्लर्क (कायदा लिपिक) म्हणून काम पाहिले. ती न्यूयॉर्कच्या स्टेट बारची सदस्यही आहे.

सामियाचे वडील आहेत गोरखपूरचे रहिवासी
सामियाचे वडील खालिद नसीम आणि आई होमैरा नसीम हे गोरखपूरचे रहिवासी आहेत. सामियाचे वडील खालिद १९७८मध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले. १९९१ पासून मॅसेच्युसेट्सच्या बॉयलेस्टोनमध्ये ते राहत आहेत. खालिद हे व्यावसायिक वकील आहेत. तर होमायरा या प्लास्टिक इंजिनिअर आहेत. सामियाचे आई-वडील विविध सामाजिक संस्थांचे सदस्य आहेत. 

गोरखपूरच्या जिरेटोपात मानाचा तुरा
सामिया अमेरिकेत न्यायाधीश झाल्याची बातमी समजल्यानंतर गोरखपूरमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. सामियाच्या निवडीमुळे तेथील अनेकांसाठी ती प्रेरणास्त्रोत ठरली. अनेक तरुण-तरुणींसाठी ती रोल मॉडेल बनली त्यामुळे गोरखपूरच्या जिरेटोपात सामियाने मानाचा तुरा खोवला.

- एज्युकेशनसंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

भारत नवी दिल्ली अमेरिका उत्तर प्रदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT