Career-Opportunity Sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : बेसिक सायन्समध्ये संशोधन

मागील लेखात आपण संशोधनात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची माहिती घेतली.

सकाळ वृत्तसेवा

मागील लेखात आपण संशोधनात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची माहिती घेतली.

- सविता भोळे

मागील लेखात आपण संशोधनात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची माहिती घेतली. आजच्या लेखात अशाच एका रिसर्च इन्स्टिट्यूट बद्दल म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई (TIFR) याबद्दल जाणून घेणार आहोत.

विशेषतः गणित व विज्ञानातील संशोधनासाठी समर्पित असलेले टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे अभिमत विद्यापीठ मुंबई येथे आहे तर हैदराबाद, पुणे आणि बंगळूर येथे या संस्थेची केंद्रे आहेत. आशियातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये या संस्थेची गणना होते. ‘इंडियन ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम’वर महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या डॉक्टर होमी भाभा यांच्या संकल्पनेतून व विनंतीवरून जे. आर. डी. टाटा यांनी १९४५ या बेसिक सायन्सेसमध्ये संशोधन करणाऱ्या या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टर प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी, मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि सायन्स एज्युकेशनमधील बेसिक रिसर्च केला जातो. या संस्थेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना TCS, WIPRO, INFOSYS, HDFC, AXIS BANK, ICICI BANK यासारख्या नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाते तर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी इंटरनॅशनल संस्थांमध्ये प्रवेश घेतात.

‘टीआयएफआर’मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यात या कोर्ससाठी पात्र असलेल्या उमेदवारांना संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा असतो. ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर मुंबईच्या ऑफिसला अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर विविध केंद्रांवर ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते व यातून निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखतीनंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.

फक्त ‘पीएचडी’साठी काही विषयांकरिता या प्रवेश परीक्षेतून सूट मिळते. या उमेदवारांचा GATEचा स्कोअर या ठिकाणी ग्राह्य धरला जातो.

‘टीआयएफआर’मध्ये उपलब्ध असलेले कोर्सेस...

1) MSc+PhDD

  • कालावधी ः ५ वर्ष (पूर्ण वेळ)

  • पात्रता : त्या त्या विषयातील पदवी उत्तीर्ण.

  • प्रवेश परीक्षा : TIFR GS

  • हा कोर्स बायॉलॉजी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री या चार विषयांसाठी उपलब्ध आहे.

2) Master of Science (M.Sc)D

  • कालावधी : २ वर्ष (पूर्ण वेळ)

  • पात्रता : त्या त्या विषयातील पदवी उत्तीर्ण

  • प्रवेश परीक्षा : TIFR GS

हा कोर्स बायॉलॉजी व वाइल्ड लाइफ सायन्सेस या विषयांसाठी उपलब्ध आहे.

3) Ph DD

  • कालावधी : ३ वर्षे (पूर्णवेळ)

  • पात्रता : त्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

  • प्रवेश परीक्षा : TIFR GS

हा कोर्स कॉम्प्युटर सायन्स अँड सिस्टीम स्टडीज, मॅथेमॅटिक्स, बायॉलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, सायन्स एज्युकेशन या विषयासाठी उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

  • संकेतस्थळ : https://www.tifr.res.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT