Kathak Dance Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअरच्या वाटेवर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथक डान्स

‘कथक केंद्र’ म्हणून सर्वश्रुत असलेली ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथक डान्स’ ही संस्था दिल्ली येथे असून भारतीय शास्त्रीय नृत्य- कथक यासाठी प्रसिद्ध आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘कथक केंद्र’ म्हणून सर्वश्रुत असलेली ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथक डान्स’ ही संस्था दिल्ली येथे असून भारतीय शास्त्रीय नृत्य- कथक यासाठी प्रसिद्ध आहे.

- सविता भोळे

‘कथक केंद्र’ म्हणून सर्वश्रुत असलेली ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथक डान्स’ ही संस्था दिल्ली येथे असून भारतीय शास्त्रीय नृत्य- कथक यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कथक सोबतच भारतीय शास्त्रीय संगीत व पखवाज आणि तबला यासाठीचे कोर्सेस उपलब्ध आहेत. ‘श्रीराम भारतीय कला केंद्रामध्ये’ १९५५मध्ये कथक केंद्र हे सुरुवातीला ‘कथक विंग’ म्हणून सुरू झाले. लखनौ कथक घराण्याचे प्रसिद्ध गुरू शंभू महाराज यांनी कथक केंद्राचे मुख्य म्हणून काम सुरू केले. ही संस्था १९६४मध्ये दिल्लीतील संगीत नाटक ॲकॅडमीची घटक म्हणून समाविष्ट झाली.

शंभू महाराज यांनी कथकमध्ये अनेक शास्त्रीय ठुमरी व भजनांच्या भंडाराचा समावेश केला. त्यांनी कथक मधील कुमोदिनी लाखीया, दमयंती जोशी, भारती गुप्ता, गोपीकृष्ण, मामा राव, सितारा यासारखे अनेक दिग्गज शिष्यांना प्रशिक्षित केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुतणे बिरजू महाराजांनी कथक केंद्राची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या काळातच कथक नृत्य हे मंदिरांच्या प्रांगणातून किंवा छोट्या मैफिलींमधून अद्ययावत थिएटर्समध्ये मोठ्या स्वरूपात सादर केले जाऊ लागले. बिरजू महाराजांनी कथक बॅलेट संपूर्ण जगभरात प्रसारित केले व या आपल्या पारंपारिक नृत्य प्रकाराला जगभरात ओळख मिळवून दिली.

विविध कोर्सेस

कथक डान्स - यामध्ये दोन प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत

1) एलिमेंटरी कोर्सेस

अ) फाउंडेशन कोर्स

  • कालावधी - ५ वर्षे

  • पात्रता : वय - १० ते १५ वर्षे

  • शिक्षण - तिसरी पूर्ण (कथक पूर्व प्रशिक्षण)

ब) डिप्लोमा (पास) कोर्स-

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - १५ ते २० वयवर्षे

  • शिक्षण - नववी पूर्ण

(कुठल्याही एका कलेची आवड किंवा अनुभव)

2) ॲडव्हान्स कोर्सेस

अ) डिप्लोमा (ओनर्स) कोर्स -

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - १८ ते २३ वयवर्षे

  • शिक्षण - दहावी पास (डिप्लोमा (पास) किंवा समकक्ष प्रशिक्षण)

ब) पोस्ट डिप्लोमा कोर्स -

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - २० ते २६ वयवर्षे

  • शिक्षण - बारावी किंवा समकक्ष उत्तीर्ण (डिप्लोमा (ऑनर्स) किंवा समकक्ष)

क) रिफ्रेशर कोर्स -

  • कालावधी - ६ महिने

  • पात्रता - ४० वर्ष वयाच्या आत

  • शिक्षण - पोस्ट डिप्लोमा/डिप्लोमा (ओनर्स)/डान्स टीचर

ड) प्रेपरेटरी फेज -

  • कालावधी - १ वर्ष

  • पात्रता - १८ ते २३ वयवर्षे

  • शिक्षण - अट नाही मात्र होतकरू व प्रशिक्षणासाठी उत्साही

संगीत

यामध्ये दोन प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत

1) वाद्य संगीत (तबला/पखवाज)

अ) सर्टिफिकेट कोर्स (तबला/पखवाज) -

  • कालावधी - १ वर्ष

  • पात्रता - १४ ते १७ वयवर्षे

  • शिक्षण - सहावी पूर्ण (तालसुराचे ज्ञान आवश्यक)

ब) डिप्लोमा कोर्स (तबला/पखवाज) -

  • कालावधी - ५ वर्षे

  • पात्रता - १५ ते २० वयवर्षे

  • शिक्षण - आठवी पूर्ण

(सर्टिफिकेट कोर्स इन तबला/ पखवाज)

2) कंठसंगीत/गायन

स्पेशल कोर्स इन व्होकल म्युझिक (गायन) -

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - १८ ते ३० वयवर्षे

  • शिक्षण - बारावी पास किंवा समकक्ष

(गायनाचे बेसिक प्रशिक्षण)

या सर्व कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाच्या ॲडमिशन पोर्टलवरून अर्ज डाऊनलोड करावयाचा असतो.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकेतस्थळ - https://kathakkendra.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT