national law school of india university sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी

प्रशांत पाटील

नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी हे राष्ट्रीय कायदा विद्यापीठ बंगळूरमध्ये असून या प्रकारचे देशातील पहिले विद्यापीठ आहे.

- सविता भोळे

नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी हे राष्ट्रीय कायदा विद्यापीठ बंगळूरमध्ये असून या प्रकारचे देशातील पहिले विद्यापीठ आहे. भारतात सर्वांत आधी या क्षेत्रातील पाच वर्षांचा इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि डॉक्टरेट लॉ डिग्री सुरू केली गेली. हार्वर्ड लॉ स्कूलच्या धर्तीवर भारतातही अशा प्रकारचे विद्यापीठ सुरू होण्यासाठी आपले माजी चीफ जस्टिस महम्मद हिदायतुल्लाह, राम जेठमलानी व उपेंद्र बक्षी यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या लिगल एज्युकेशन कमिटीच्या माध्यमातून सुमारे दोन दशके प्रयत्न केले. कर्नाटक सरकार आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १९८६ मध्ये या विद्यापीठाची बंगळूर येथे स्थापना झाली. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू एन.आर. माधव मेनन होते. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी नेहमीच्या लेक्चर पद्धतीला विरोध केला व हॉर्वर्ड लॉ स्कूल प्रमाणे येथेही केस मेथड स्टडीला सुरुवात केली. त्यांनी ग्रुप टीचिंग ही नवीन संकल्पना ही येथे राबविली ज्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रोफेसर्स वर्ग चालवितात. अशाप्रकारे या संस्थेने कायदा शिक्षण क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडवून आणली.

या विद्यापीठात कायदा आणि संबंधित विद्याशाखांचे विविध १६ कोर्सेस राबविले जातात.ज्यामध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरल प्रोग्रॅम यांचा समावेश आहे. या विद्यापीठात डिस्टन्स एज्युकेशन विभाग असून त्याअंतर्गत विविध ऑनलाइन तसेच हायब्रीड कोर्सेसही चालविले जातात.

संशोधनासाठी ११सेंटर्स असून त्यामध्ये कायदा, ह्यूमन राइट्स, चाइल्ड राईट्स, एन्व्हायरमेंटल लॉज, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी, सोशल एक्सलूजन, लॉ अँड एथिक्स इन मेडिसिन, सायबर लॉ अँड फॉरेन्सिक, लेबर स्टडीज अशा विविध कायदा संबंधित विषयावर संशोधन केले जाते.

संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो आणि अंतिम प्रवेशासाठी मेरीट तसेच राष्ट्रीय राज्य आणि विद्यापीठ स्तरावर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचा स्कोअर ग्राह्य धरला जातो.

या विद्यापीठातून मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत सर्वोच्च न्यायालयात तसेच टीसीएस, इवाय, एचसीएल, ॲसेन्ट्युअर, इन्फोसिस, कॉग्निझंट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीच्या सामावून घेतले जाते.

विद्यापीठात राबविले जाणारे महत्त्वाचे कोर्सेस

१) मास्टर ऑफ लॉ (L.L.M.)

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - L.L.B. (५० टक्के गुणांसह)

  • प्रवेश परीक्षा - CLAT

हा कोर्स १) बिझनेस लॉ

२) ह्यूमन राइट्स अशा २ विषयात राबविला जातो.

२) बी.ए., एलएल.बी. (B.A., LL.B.+Hons.)

  • कालावधी - ५ वर्षे

  • पात्रता - बारावी उत्तीर्ण

  • प्रवेश परीक्षा - CLAT

३) एल.एल.डी (L.L.D.)

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - L.L.M. (५५ टक्के गुणांसह)

  • प्रवेश परीक्षा - विद्यापीठाची प्रवेश परीक्षा व इंटरव्‍ह्यू.

४) पीएच.डी. (Ph.D)

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - L.L.M. (५० टक्के गुणांसह)

  • प्रवेश परीक्षा - विद्यापीठाची प्रवेश परीक्षा व इंटरव्‍ह्यू.

हा कोर्स १) लॉ २) इंटर डिसिप्लिनरी अशा २ विषयात राबविला जातो.

५) मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी (M.P.P.)

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - L.L.B. (५० टक्के गुणांसह)

  • प्रवेश परीक्षा - CLAT

६) एम.फिल. (M.Phil.)

  • कालावधी - १ वर्ष

  • पात्रता - L.L.M. (५५ टक्के गुणांसह)

  • प्रवेश परीक्षा - लेखी परीक्षा व इंटरव्ह्यू.

हा कोर्स १) लॉ २) पब्लिक पॉलिसी अशा २ विषयात राबविला जातो.

७) एम.फिल. + पीएच.डी. (M.Phil.+Ph.D)

  • कालावधी - ५ वर्षे

  • पात्रता - L.L.M. (५५ टक्के गुणांसह)

  • प्रवेश परीक्षा - लेखी परीक्षा व इंटरव्ह्यू.

हा कोर्स पब्लिक हेल्थ या विषयासाठी राबविला जातो.

८) पीजी डिप्लोमा (P.G. Diploma)

  • कालावधी - १ वर्ष

  • पात्रता - LL.B.

  • प्रवेश परीक्षा - मेरिटवर.

हा कोर्स १) इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स लॉ, २) ह्यूमन राइट्स, ३) एन्व्हॉयर्मेंटल लॉ, ४) सायबर लॉ, ५) कंझ्युमर लॉज, ६) मेडिकल लॉ अँड एथिक्स, ७) चाइल्ड राइट्स लॉ अशा ७ विषयांत राबविला जातो.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ - https://www.nls.ac.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT