What is Coding in marathi 
एज्युकेशन जॉब्स

What is Coding: कोडिंग म्हणजे नक्की काय?

What is Coding in Marathi: गेल्या काही महिन्यांत आपण मुलांसाठी कोडिंग याबद्दल बऱ्याच बातम्या ऐकल्या आहेत आणि कोडिंग शिकणे कसे महत्त्वाचे आहे, याबद्दलही ऐकले आहे.

श्वेता दांडेकर

What is Coding: संगणक आता सर्वत्र आहेत आणि ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाले आहेत. भविष्यात संगणक तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन व्यवहाराला जोडले जाईल आणि सर्व क्षेत्रांचा एक अविभाज्य भाग होईल.

गेल्या काही महिन्यांत आपण मुलांसाठी कोडिंग याबद्दल बऱ्याच बातम्या ऐकल्या आहेत आणि कोडिंग शिकणे कसे महत्त्वाचे आहे, याबद्दलही ऐकले आहे.

कोडिंग म्हणजे नक्की काय? (What is Coding in Marathi)
कोडिंग म्हणजे संगणकाला सूचना देणे व त्या सूचनांप्रमाणेच कार्य करायला लावणे. संगणकास सूचना देणाऱ्या कोडिंगच्या ओळींना प्रोग्राम म्हणतात. उदाहरणार्थ ः व्हिडिओ सुरू करणे, कॉम्प्युटर गेम सुरू करणे आदी.

आपला ब्राउझर, सर्व ॲप्स, आपला लॅपटॉप किंवा फोनची ऑपरेटिंग सिस्टम - हे कोडद्वारा बनलेले आहेत. येथे प्रोग्रामिंग भाषा येतात.

ज्याप्रमाणे मानवी भाषा आपल्याला एकमेकांशी बोलण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे प्रोग्रामिंग भाषा संगणकाशी ‘बोलण्यास’ मदत करतात. आपण ऐकलेल्या, सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या‍ काही भाषा आहेत - Python, C, C++, Java, Javascript, आणि HTML.

कोणती भाषा वापरायची हे संगणकासह आपण काय प्राप्त करू इच्छिता यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, वेबसाइट बनवण्यासाठी सामान्यतः HTMLचा वापर केला जातो, Python data analysis साठी उत्तम आहे आणि Scratch आपल्याला परस्परसंवादी कथा, खेळ आणि अ‍ॅनिमेशन तयार करू देते.

विचार करणे शिकण्यासाठी...
प्रोग्रामिंगची भाषा शिकणे व भविष्यात नोकरीमध्ये त्याचा वापर करणे यापलीकडे कोडिंगचे इतर फायदे आहेत. स्टीव्ह जॉब्स एकदा म्हणाले होते, ‘‘प्रत्येकाने संगणक प्रोग्राम कसा करायचे हे शिकले पाहिजे, कारण तुम्हाला विचार कसा करायचे हे शिकविते.’’

कोडिंग तर्कशुद्ध विचारसरणी, अडचणी सोडवणे आणि गुणदोषांसहित विचार करण्याची क्षमता सुधारण्यास मदत करते. हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे. कोडिंग शिकणे नोकरी मिळवण्यासाठी नाही, परंतु आपली विचार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे.  

(फन फॅक्ट - चार्ल्स बॅबेज, ज्यांना सामान्यत: संगणकांचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यांचा जन्म २६ डिसेंबर, १७९१ रोजी झाला. त्यांची मैत्रीण आणि सहकारी, अ‍ॅडा लव्हलेस, जगातील पहिली प्रोग्रामर मानली जाते.) 

(लेखिका CodeFoxie.comच्या  संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT