ITI Courses esakal
एज्युकेशन जॉब्स

आयटीआय प्रवेशासाठी यंदा नोंदणीत लक्षणीय घट

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशासाठी यंदा अर्ज भरण्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी एकूण एक लाख ४९ हजार २१६ जागांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत ६९ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची सुविधा १५ जुलैपासून उपलब्ध झाली आहे. आयटीआय अभ्यासक्रमासाठी राज्यात शासकीय संस्थांमध्ये ९३ हजार ८१६ तर आणि खासगी संस्थांत ५५ हजार ४८०, अशा एकूण एक लाख ४९ हजार २९६ जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी जवळपास तीन लाख ३२ हजार २१८ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले होती. यंदा मात्र आतापर्यंत ६९ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील ६१ हजार ७२६ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले असल्याची माहिती संचालनालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित केल्यानंतर आयटीआय प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

:

विभागनिहाय प्रवेशाच्या जागा :*

विभाग : शासकीय संस्था : खासगी संस्था : जागा

अमरावती : १५,५९६ : ३,००८ : १८,६०४

औरंगाबाद : १५,०७६ : ६,१७२ : २१,२४८

मुंबई : १६,६५६ : ३,९९२ : २०,६४८

नागपूर : १४,२८८ : १३,३७२ : २७,६६०

नाशिक : १४,८८८ : १५,०५२ : २९,९४०

पुणे : १७,३१२ : १३,८८४ : ३१,१९६

एकूण : ९३,८१६ : ५५,४८० : १,४९,२९६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT