Engineering Admission  sakal
एज्युकेशन जॉब्स

Engineering,Pharmacy : अभियांत्रिकी अन्‌ फार्मसीच्या सहा हजार जागा;‘जेईई’साठी १५ टक्के तर ‘सीईटी’तून ६५ टक्के प्रवेश

‘जेईई’च्या निकालानंतर आता ‘सीईटी’चा निकालही जाहीर झाला आहे. त्यानुसार याच आठवड्यात महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये चार हजार ९६० जागा असणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ‘जेईई’च्या निकालानंतर आता ‘सीईटी’चा निकालही जाहीर झाला आहे. त्यानुसार याच आठवड्यात महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये चार हजार ९६० जागा असणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील १४ फार्मसी महाविद्यालयांमध्ये एक हजार ८० जागा आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना प्रक्रियेनुसार प्रवेश घेता येतील.

सोलापूर जिल्ह्यात कॉलेज ऑफ फार्मसी, जुळे सोलापूर, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, अकलूज, कॉलेज ऑफ फार्मसी, गोपाळपूर (पंढरपूर) याशिवाय जिल्ह्यातील आणखी ११ फार्मसी महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता एकूण १०८० इतकी आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये डब्ल्यूआयटी, सिंहगड, ऑर्किड, ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेलाटी, गोपाळपूर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च, जामगाव (बार्शी), सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, शंकरनगर (अकलूज), वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर अशी नामांकित महाविद्यालये जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील सहा अभियांत्रिकी महाविद्यालये तर तीन फार्मसी महाविद्यालये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाशी संलग्नित आहेत. याशिवाय आठ अभियांत्रिकी महाविद्यालये व ११ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये ‘बाटु’शी संलग्नित आहेत. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या जेईई व सीईटीच्या गुणांनुसार महाविद्यालये व त्यातील ब्रॅंचेस (अभ्यासक्रम) निवडावा लागणार आहे.

प्रवेशाच्या तीन फेऱ्या; विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांचा पर्याय

अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तीन प्रवेश फेऱ्या असणार आहेत. अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना सुरवातीला नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयातील विशेष कक्षातून त्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या काही हरकती असल्यास त्या मागवून त्यांचे निरसन केले जाते. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ऑप्शन फॉर्म भरून घेतले जातात. त्यात गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना राज्यभरातील ३०० महाविद्यालये व तेथील आवडीचा अभ्यासक्रम (ब्रॅंच) पसंतीक्रमाने निवडण्याची संधी दिली जाते.

ऑप्शन फॉर्म भरताना ‘हे’ लक्षात ठेवा

  • विद्यार्थी नोंदणीनंतर कागदपत्रे पडताळणी आणि त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल

  • गुणवत्ता यादीनंतर विद्यार्थ्यांना ३०० महाविद्यालयांचा म्हणजेच त्या कॉलेजमधील आवडत्या ब्रॅंचेसचा पसंतीक्रम द्यावेत

  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार अलॉटमेंट यादी प्रसिद्ध होईल, त्यावेळी आपल्याला कोणते कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल हे स्पष्ट होईल

  • पहिल्या अलॉटमेंटनंतरही आपल्याला आवडीचे कॉलेज किंवा ब्रॅंच न मिळाल्यास दुसरे कॉलेज व बॅंचचा पर्याय तथा पसंतीक्रम द्यावा

  • दुसऱ्या फेरीत देखील आपल्याला कॉलेज व ब्रॅंच आवडीची न मिळाल्यास पुन्हा विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलता येईल

  • ज्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत आवडते कॉलेज व ब्रॅंच मिळाल्यास त्यांनी तातडीने फ्रिज करून त्याठिकाणी प्रवेश घ्यावा

प्रवेशावेळी कोणती कागदपत्रे लागतात?

प्रवेशावेळी खुला प्रवर्ग वगळता उर्वरित सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी (व्हॅलिडीटी) प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोमेसाईल (रहिवासी दाखला) व नॉन-क्रिमीलेअर आवश्‍यक असणार आहे.

अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, आयटी (माहिती तंत्रज्ञान) या कोर्सेसकडे कल जास्त दिसत आहे. पण, याशिवाय अन्य ब्रॅंचेसमधूनही नोकरीच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी सर्व कागदपत्रे काढून ठेवावीत.

- डॉ. बी. के. सोनगे,

प्राचार्य, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर

आकडे बोलतात

  • ‘फार्मसी’ची प्रवेश क्षमता: १०८०

  • ‘अभियांत्रिकी’ची प्रवेश क्षमता : ४,९६०

  • व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश: २० टक्के

  • ‘जेईई’तून प्रवेश: १५ टक्के

  • ‘सीईटी’तून प्रवेश: ६५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT