ATMA Canva
एज्युकेशन जॉब्स

ATMA 2021 मे सेशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू ! "ही' आहे शेवटची तारीख

ATMA मे सेशनसाठी रजिस्ट्रेशनला सुरवात झाली आहे

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल (AIMS) च्या मे सेशनसाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन (ATMA 2021) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी 26 एप्रिलपासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 23 मे 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार atmaaims.com वर भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

ऑनलाइन नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइटवर एक लिंक उपलब्ध आहे. नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रतेचे निकष तपासले पाहिजेत. मेच्या सत्रासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन (एटीएमए 2021) 30 मे 2021 रोजी होणार आहे. होम बेस्ड ऑनलाइन मोडमध्ये परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत एका शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.

या आहेत महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन नोंदणीसाठी प्रारंभ तारीख : 26 एप्रिल 2021

  • फी भरण्याची शेवटची तारीख : 22 मे 2021

  • ऑनलाइन नोंदणीसाठी अंतिम तारीख : 23 मे 2021

  • अर्ज फॉर्मची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख : 25 मे 2021

  • प्रवेशपत्र देण्याची तारीख : 26 मे 2021

  • परीक्षेची तारीख : 30 मे 2021

  • निकाल जाहीर तारीख : 5 जून 2021

असे करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट atmaaims.com वर भेट द्यावी. यानंतर मेन पेजवरील उपलब्ध इम्पॉर्टंट डेट्‌स सेक्‍शनमध्ये एटीएमए परीक्षा लिंकवर नोंदणी करण्यासाठी क्‍लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. माहिती, नाव, जन्मतारीख, शहर, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाका आणि ऑनलाइन फी भरा. यानंतर आपण पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. अर्जाशी संबंधित सूचनाही वेबसाइटवर जारी केल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT