hsc ssc board Sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC-HSC Exam : विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह स्वीकारणार

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज १२ जानेवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह स्वीकारण्यात येणार.

सकाळ वृत्तसेवा

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज १२ जानेवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह स्वीकारण्यात येणार.

पुणे - दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी (SSC and HSC Board Exam) खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ (Form No. 17) भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे (Student) ऑनलाइन नावनोंदणी अर्ज (Online registration Form) १२ जानेवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह (Late Fee) स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

मार्च-एप्रिल २०२२मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी १८ डिसेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु आता राज्य मंडळामार्फत या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याच्या अंतिम तारखा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार माध्यमिक शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अतिविलंब शुल्क प्रती विद्यार्थी वीस रुपये प्रतिदिनी स्वीकारून विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज भरण्यासाठी १२ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी देणे अनिवार्य आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत त्वरित परीक्षेपूर्वी समक्ष विभागीय मंडळात शुल्कासह सादर करणे आवश्यक राहील. ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्याची ही शेवटची अंतिम मुदतवाढ दिलेली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ -

- दहावी :- http://form17.mh-ssc.ac.in

- बारावी :- http://form17.mh-hsc.ac.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT