Jobs_SSC 
एज्युकेशन जॉब्स

SSC CGL 2021: अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; ६५०६ पदांसाठी होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

SSC CGL 2021: पुणे : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) भरती २०२१ साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अजूनही ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. एकूण ६५०६ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

परीक्षेच्या तारखा
स्टाफ सिलेक्शन कमिशनने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, २९ मे ते ७ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेअंतर्गत विविध ३२ पदांसाठी ६५०६ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांमध्ये सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, अपर विभागीय लिपिक, कर सहाय्यक यांचा समावेश आहे. 

कोण करू शकतं अर्ज?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवीधर या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. १ जानेवारी २०२१ किंवा त्यापूर्वीची आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी अधिसूचना पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे. 

- SSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- SSC अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- SSC ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT