SSC GD Constable 2021 : एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी! कर्मचारी निवड आयोगाकडून 10 जुलैपर्यंत या परीक्षेबाबत अधिसूचना जारी होण्याची शक्यता असून त्याबाबत लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, उमेदवारांना आयोगाने अधिकृत संकेतस्थळला https://ssc.nic.in/" rel="nofollow भेट देण्याचा सल्ला दिला असून जेणेकरून त्यांना अधिकृत अधिसूचनेबद्दल माहिती मिळू शकेल, असे आयोगाने स्पष्ट केलेय. (SSC GD Constable 2021 When Will The SSC Release The Notification Of GD Constable Recruitment Exam Check Details)
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी! कर्मचारी निवड आयोगाकडून 10 जुलैपर्यंत या परीक्षेबाबत अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
या व्यतिरिक्त एसएससीने दिल्ली पोलिस (Delhi Police), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) भरती परीक्षा-2019 (पेपर -2) यासह सीआयएसएफबाबत (SSC CHSL) अधिसूचना जारी केलीय. तसेच भरती-2020 (पेपर -1) परीक्षाही जारी करण्यात आलीय. आयोगाच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस, सीएपीएफ (सीएपीएफ) उपनिरीक्षक आणि सीआयएसएफ (सीआयएसएफ) सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा (पेपर- II) 2019 या विविध परीक्षा 26 जुलै 2021 रोजी घेण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 4 ते 12 ऑगस्ट 2021 या कालावधीत संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा (Combined Graduate Level Examination) (श्रेणी -1) (Tier-I) भरती परीक्षा घेण्यात येणार आहे.
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेच्या निवडीसाठी सर्वप्रथम संगणक आधारित लेखी परीक्षा होईल. त्या लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलविण्यात येईल. या व्यतिरिक्त लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रीझनिंग, जनरल नॉलेज अॅण्ड जनरल अवेयरनेस, एलिमेंटरी मॅथ्स आणि इंग्लिश / हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. तसेच एसएससीकडून विविध भरती परीक्षांशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देखील देऊ शकतात.
SSC GD Constable 2021 When Will The SSC Release The Notification Of GD Constable Recruitment Exam Check Details
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.