SSC GD esakal
एज्युकेशन जॉब्स

निमलष्करी दलात तब्बल 25,271 जागा रिक्त; 'या' दिवशी होणार परीक्षा

बाळकृष्ण मधाळे

SSC GD Recruitment 2021 : भारतीय निमलष्करी दलांना लवकरच 25,271 नवीन कॉन्स्टेबल मिळणार आहेत. सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) जनरल ड्यूटी (GD) कॉन्स्टेबलच्या 25,271 पदांची भरती करत आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. SSC ने 17 जुलै ते 31 ऑगस्ट या भरतीसाठी अर्ज मागवले होते. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती BSF, ITBP, CISF आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये कॉन्स्टेबलच्या पदांवर केली जाईल.

भारतीय निमलष्करी दलांना लवकरच 25,271 नवीन कॉन्स्टेबल मिळणार आहेत.

लेखी परीक्षा 16 नोव्हेंबरपासून सुरू

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेला बसणं आवश्यक आहे. एसएससीने जाहीर केलेल्या तारखेनुसार, जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील PET, PST आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उपस्थित रहावं लागेल. दरम्यान, लेखी परीक्षा वगळता इतर परीक्षा केवळ पात्रतेच्या आधारावर असतील.

भरतीसाठी लाखो उमेदवारांचे अर्ज

जीडी कॉन्स्टेबलच्या या भरतीसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात रिक्त पदांची संख्या केवळ 25,271 असली तरी SSC लेखी परीक्षेतच मोठ्या संख्येनं उमेदवारांना वगळलं आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांना लेखी परीक्षेतील एकूण उपलब्ध पदांच्या केवळ 12 पट यशस्वी घोषित केलं जाऊ शकतं. तथापि, SSC लेखी परीक्षेत यशस्वी घोषित करणाऱ्या उमेदवारांची संख्या पूर्णपणे SSC च्या कोट्यावरती अवलंबून असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT