SSC HSE Exams 2022 exam shedule 10th 12th exam schedule announced check here  sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC-HSC Exams : तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक :

तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी

बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम  : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३

दहावी : २ मार्च ते २५ मार्च २०२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

PM Narendra Modi: उद्याच्या संविधान दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण होणार नाही; विरोधकांनी केली भाषणाची मागणी

Vijay Wadettiwar : हा विजय ईव्हीएमचाच, हार घालून साजरा करा

IPL 2025 Auction Live: अर्जुन तेंडुलकर आधी अनसोल्ड अन् मग सोल्ड! पुन्हा मुंबई इंडियन्समध्येच खेळणार

SCROLL FOR NEXT