SSC Result 2023 education kokan top 151 students get 100 percentes in ssc board 108 from latur  
एज्युकेशन जॉब्स

SSC Result 2023 : कोकणच सरस, मुलींची आघाडी कायम; दहावीत १५१ जणांना १०० टक्के गुण, १०८ जण लातूर विभागातील

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून त्यात सिंधुदुर्ग जिल्हा पहिला ठरला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई/पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून त्यात सिंधुदुर्ग जिल्हा पहिला ठरला आहे. यंदाचा निकाल हा मागील तीन वर्षांच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

दहावीत यंदा १५१ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळवले असून त्यात लातूर विभागातील सर्वाधिक असे १०८ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षेला यंदा १५ लाख ४१ हजार ६६६ जणांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एकूण १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के इतका लागला आहे, तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के इतका लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.८२ टक्क्यांनी अधिक आहे.

परीक्षेत ९५.८७ टक्के मुली तर ९२.०५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असून ८ हजार ३१२ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.४९ टक्के इतकी आहे.

नियमित विद्यार्थ्यांची आकडेवारी

तपशील : मुले : मुली : एकूण

नोंदणी केलेले : ८,२१,५२४ : ७,२०,१४२ : १५,४१,६६६

परीक्षा दिलेले : ८,१४,१६१ : ७,१४,९३५ : १५,२९,०९६

उत्तीर्ण झालेले : ७,४९,४५८ : ६,८५,४४० : १४,३४,८९८

उत्तीर्णतेची टक्केवारी : ९२.०५ टक्के : ९५.८७ : ९३.८३

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी (टक्क्यांत)

विभागीय मंडळ : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : २,५८,७९३ : २,४७,५३१ : ९५.६४ टक्के

नागपूर : १,४९,७०२ : १,३७,८१२ : ९२.०५ टक्के

औरंगाबाद : १,७६,८४६ : १,६४,८८५ : ९३.२३ टक्के

मुंबई : ३,३५,१२० : ३,१३,८७६ : ९३.६६ टक्के

कोल्हापूर : १,२८,५०३ : १,२४,३१२: ९६.७३ टक्के

अमरावती : १,५६,५७३ : १,४५,९६५ : ९३.२२ टक्के

नाशिक : १,९२,७५४ : १,७७,७७६ : ९२.२२ टक्के

लातूर : १,०२,८८२ : ९५,३४५ : ९२.६७ टक्के

कोकण : २७,९२३ : २७,३९६ : ९८.११टक्के

परीक्षेतील गैरप्रकार

तोतयेगिरी : ००

कॉपी : ११६

शिक्षक साह्य : ०२ :

इतर : २४८

एकूण : ३६६

शाळांच्या निकालाची टक्केवारी

- शून्य टक्के निकालांच्या शाळा : ४३

- शंभर टक्के निकालांच्या शाळा : ६,८४४

टक्केवारीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या १०० टक्के : १५१

९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त : ६६,५७८

८५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,०९,३४४

८० टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,४६,९६१

७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,६७,३८४

७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,७५,६६७

६५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त : १,७३,३००

४५ टक्के ते ६० टक्क्यांपर्यंत : ३,४१,३९०

सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी

मिळालेल्या सवलतीचा प्रकार : विद्यार्थ्यांची संख्या

शास्त्रीय नृत्य : १,७६८

शास्त्रीय गायन : २,३१८

शास्त्रीय वादन : १,३८९

लोककला : २४,१६०

नाट्य : १६

चित्रकला : १,१७,७८३

क्रीडा : २५,१६१

एनसीसी : ४८

स्काउट गाइड : ९४३

एकूण : १,७३,५८६

टॉप जिल्हे

सिंधुदुर्ग - ९८.५४

कोल्हापूर - ९७.२१

रत्नागिरी - ९७.९०

सातारा - ९६.७२

बीड - ९६.२४

सांगली - ९६.०८

निकालाची वैशिष्ट्ये

  • एकूण ६७ विषयांपैकी २५ विषयांचा निकाल १०० टक्के

  • ३६,६४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी २२,३२० विद्यार्थी उत्तीर्ण

  • १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ७४.२५ टक्के निकाल

  • राज्यातील ४३ शाळांचा शून्य टक्के, तर ६,८४४ शाळांचा १०० टक्के निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT