मुंबई : मागील वर्षी नववीच्या विद्यार्थ्यांना (ninth standard student) अनिवार्य करण्यात आलेला जलसुरक्षा हा विषय यंदा दहावीसाठी (SSC) श्रेणी विषय म्हणून अनिवार्य करण्यात आला आहे. तर दहावीत स्वविकास व कलारसस्वाद या विषयाऐवजी जलसुरक्षा हा विषय अनिवार्य (Subject compulsory) करण्यासाठी दिरंगाई झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक संभ्रमात (parents confusion) सापडले आहेत.
इयत्ता दहावीसाठी स्वविकास व कलारसस्वाद या श्रेणी विषयांऐवजी जलसुरक्षा हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहून कळविले आहे. यासाठीचे मागील महिन्यात पुस्तक बालभारतीकडून बाजारात उपलब्ध करून देण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला असून हे पुस्तक बाजारात मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
राज्य शिक्षण मंडळाकडून चार वर्षांपूर्वी इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर त्यामध्ये जलसुरक्षा या विषयाचा श्रेणी विषय म्हणून समावेश करण्यात आला होता. यानुसार काही शाळांमध्ये हा विषय विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून देण्यात आला होता. मात्र या विषयाचे छापील पुस्तकच बाजारात उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा विषय अनिवार्य करता आला नव्हता. मात्र मागील वर्षी हा विषय नववीत लागू केल्यानंतर आता शिक्षण मंडळाने यंदा शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून स्पष्टता आणली. पण हे परिपत्रक शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर इतक्या उशीरा काढल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
वर्षे सुरू होण्यापूर्वी विषय बदल हवा होता
विषय बदल शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित असते. तसेच याबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण होणेही आवश्यक आहे. मात्र हे काहीच झाले नसल्याने हा विषय शिक्षकांनी कसा शिकवायचा असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.ऑगस्ट महिन्यात बाजारात पुस्तक आणण्यापूर्वी शिक्षण विभागाने शिक्षकांचे या विषयासाठी रीतसर प्रशिक्षण घेणे आवश्यक होते, मात्र तसे काहीही घेतलेले नाही. त्यामुळे अचानकपणे शिक्षकांच्या माथ्यावर हा विषय लादला असल्याचा आरोप दराडे यांनी केला आहे. बालभारतीने ऑगस्ट महिन्यात जलसुरक्षा या विषयाचे पुस्तक बाजारात आणलेले आहे.बहुतांश ठिकाणी ते मिळत आहे. शिवाय पीडीएफ प्रत ही आम्ही उपलब्ध करून असल्याचे बालभारतीचे नियंत्रक, विवेक गोसावी यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.