'एसएससी'ने जाहीर केला कौशल्य चाचणीसाठी परीक्षा पॅटर्न ! Canva
एज्युकेशन जॉब्स

'एसएससी'ने जाहीर केला कौशल्य चाचणीसाठी परीक्षा पॅटर्न !

"एसएससी'ने जाहीर केला कौशल्य चाचणीसाठी परीक्षा पॅटर्न ! जाणून घ्या सविस्तर

श्रीनिवास दुध्याल

स्टाफ सिलेक्‍शन कमिशनने कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) स्किल टेस्ट 2019 चा परीक्षा नमुना जाहीर केला आहे.

सोलापूर : स्टाफ सिलेक्‍शन कमिशनने (Staff Selection Commission) कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) (Combined Graduate Level) स्किल टेस्ट 2019 चा (Skill Taste 2019) परीक्षा नमुना जाहीर केला आहे. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी या चाचण्या घेण्यात येतील. कौशल्य चाचणीमध्ये तीन मोड्यूल्स असतील : डेटा एंट्री स्पीड टेस्ट (DEST), प्रेझेंटेशन/जनरेशन ऑफ पॉवर पॉइंट स्लाइड्‌स (MS Power Point) आणि स्प्रेडशीट (MS Excel). (Staff Selection Commission announces exam pattern for skills test-ssd73)

डेटा एंट्री स्पीड टेस्ट (DEST) साठी अंदाजे 2000 की-डिप्रेशनचा एक मुख्य मास्टर टेक्‍स्ट पॅसेज दिला जाईल. या चाचणीचा कालावधी 15 मिनिटांचा असेल. मास्टर पॅसेजच्या परिच्छेदानुसार उमेदवार केवळ समान संख्येचे शब्द टाईप करू शकतात. मास्टर पॅसेज परिच्छेदामध्ये दिलेल्या शब्दांची संख्या टाईप केल्यानंतर, स्पेस बार अतिरिक्त शब्द टाईप करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.

असा राहील परीक्षा पॅटर्न

जर उमेदवाराने अतिरिक्त शब्द / चुकीचे शब्द टाइप केल्यास त्यायोगे मास्टर पॅसेज पूर्ण करण्यापूर्वी शब्दांची संख्या समाप्त होत असेल तर, त्याने मजकुरावर प्रक्रिया करण्यापूर्वी चुकीचे टाईप केलेले शब्द दुरुस्त करण्यासाठी ऍरो की किंवा बॅकस्पेस की वापरू शकता. उमेदवारांच्या मदतीसाठी, "टायपिंग टेस्ट / डीईएसटी'चा डेमो व्हिडिओ "कॅंडिडेट कॉर्नर'मध्ये कमिशनच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.

संगणक प्रवीणता चाचणी (सीपीटी) मध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन / न्यू स्लाइड्‌स तयार करणे (एमएस पॉवर पॉइंट) आणि स्प्रेडशीट (एमएस एक्‍सेल) अतिरिक्त दोन मॉड्यूल असतील. या दोन्ही चाचण्या एमएस ऑफिस प्लॅटफॉर्मवर (मायक्रोसॉफ्ट ऑफिस -2007 आणि उच्च आवृत्ती) घेण्यात येतील आणि प्रत्येक मॉड्यूलचा कालावधी 15 मिनिटे असेल. हे मॉड्यूल्स एकामागून एक घेण्यात येतील. दोन्ही मॉड्यूल्स पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या कामाचे प्रिंटआउट घेतले जाईल. अधिक माहिती व सूचना तपासण्यासाठी या लिंकवर https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/Important_Notice_English_27072021.pdf क्‍लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT