कुडाळ : सिंधुदुर्ग (sindhudurg) आणि रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत (viinayak raut) व पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांच्या प्रयत्नांतून दोन नीट (NEET exam) परीक्षा केंद्रे मंजूर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधार मिळाला असून परीक्षेसाठी गोवावारी आता थांबणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पालकांत कौतुक होत आहे.
वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते; मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे नीट परीक्षेची केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हावे, अशी मागणी होत होती.
याबाबत आमदार वैभव नाईक तसेच बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी खासदार राऊत व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खासदार राऊत व श्री. सामंत व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नॅशनल टेस्टिंग एजन्जीचे चेअरमन एम. एस. अनर्थ यांच्याकडे १८ मार्च २०२१ व ऑगस्टच्या पत्रान्वये व केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याकडे दिनांक २० ऑगस्ट २०२०च्या पत्रान्वये सातत्याने पाठपुरावा केला होता.
आवश्यक असलेली प्रक्रिया जी केंद्र सरकारची नॅशनल टेस्टिंग, राज्य शासनाची वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय मुंबई व जिल्हाधिकारी सिंधुदुर्गच्या माध्यमातून होते. ती वेळोवेळी पाठपुरावा करून पूर्ण करून घेतली आणि त्यामुळेच संपूर्ण देशामध्ये नीट परीक्षेची नवीन ५५ केंद्रे मंजूर करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन नीट परीक्षा केंद्रे मंजूर झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.