10th-12th supplementary examination result sakal
एज्युकेशन जॉब्स

राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

राज्य मंडळाच्या जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील २० हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मीनाक्षी गुरव

राज्य मंडळाच्या जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील २० हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत ३०. ४७ टक्के, तर बारावीच्या पुरवणी परीक्षेत ३२.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळातर्फे शुक्रवारी ऑनलाइनद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.

राज्य मंडळाच्या जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील २० हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील पाच हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य, एचएससी व्होकेशनल या शाखांमधील ५४ हजार ५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तब्बल ५३ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल -

राज्यातील पुरवणी परीक्षेतील २०२०च्या निकालाच्या तुलनेत (३२.६० टक्के) यंदाच्या निकालात घट झाल्याचे दिसून २.१३ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळात लातूर विभागातील सर्वाधिक ५१.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेले एकूण सात हजार ६४३ विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये एटीकेटीच्या सवलतीद्वारे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात.

पुणे विभागीय मंडळातील २४.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागातील चार हजार १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील एक हजार २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल -

पुरवणी परीक्षेत औरंगाबाद विभागीय मंडळाचा सर्वाधिक निकाल लागला असून या विभागातील ४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर २०२०मधील (१८.४१ टक्के) निकालाच्या तुलनेत यंदा निकालात १३. ८७ टक्क्यांनी वाढ झाली आहेत. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा विभागनिहाय निकाल (विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी)

विभागीय मंडळ : दहावी : बारावी

पुणे : २४.७३ टक्के : २९.०९ टक्के

नागपूर : ४५.६५ टक्के : ३९.१३ टक्के

औरंगाबाद : ३९.७६ टक्के : ४८ टक्के

मुंबई : २२.६२ टक्के : ३१.३० टक्के

कोल्हापूर : ३२.८४ टक्के : २९.७० टक्के

अमरावती : ३९.६३ टक्के : ३४.५५ टक्के

नाशिक : ३९.१३ टक्के : ३१.०८ टक्के

लातूर : ५१.७४ टक्के : ४२.८८ टक्के

कोकण : ३५.५९टक्के : २५.६६ टक्के

शाखानिहाय बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल -

शाखा : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

विज्ञान : १०,७५५ : ५,९९४ : ५५.७३ टक्के

कला : १८,१२८ : ३,९९६ : २२. ०४ टक्के

वाणिज्य : २२,५८३ : ६,७२८ : २९.७९ टक्के

एचएससी-व्होकेशनल : १,९५२ : ४६५ : २३.८२ टक्के

आयटीआय : १२९ : ९८ : ७५.९६ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT