Student Service Center will set up at Institute of Higher Education University Grants Commission pune sakal
एज्युकेशन जॉब्स

उच्च शिक्षण संस्थेत ‘विद्यार्थी सेवा केंद्र’ स्थापन होणार

विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश; विद्यार्थ्यांच्या निरोगी शारीरिक, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य निरोगी राहावे, या हेतूने त्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्तीसह उच्च शिक्षण संस्थेत विद्यार्थी सेवा केंद्र स्थापन करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. याबाबत आयोगाने नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत आता देश पातळीवर गांभीर्याने विचार होत असल्याचे निदर्शनास येते.

आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘विद्यार्थी सेवा केंद्रा’ची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आणि नैराश्य दूर करणे, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गळती रोखणे, तसेच त्याचे प्रश्न सोडविणे यासाठी ‘विद्यार्थी सेवा केंद्र’ ही सुविधा एक खिडकी पद्धतीने काम करणार आहे. उच्च शिक्षण संस्थेतील कॅम्पस, वसतिगृह, मैदाने, कॅन्टीन, ग्रंथालय अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षितता लक्षात घेऊन आयोगाने मार्गदर्शक सूचना कार्यान्वित केल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम राहण्याबाबत उच्च शिक्षण संस्थांमध्ये समुपदेशक आणि करिअर मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याची तरतूद नवीन शैक्षणिक धोरणात आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये आणि विद्यार्थ्यांवर शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, भाषिक ताण येऊ नये, तसेच विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे हित लक्षात घेऊन शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करणे हे उच्च शिक्षण संस्थांची जबाबदारी असल्याचेही आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचा मानसिक, भावनिक, शारीरिक सुरक्षितता लक्षात घेऊन सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी आयोगाने तज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरूस्तीसह उत्तम मानसिक आरोग्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना अनुदान आयोगाने अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केल्या आहेत. देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे यात आयोगाने स्पष्ट केले आहे.

असे असेल विद्यार्थी सेवा केंद्र

  • प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेमध्ये केंद्राची स्थापना करण्याचे आदेश

  • विद्यार्थ्यांमधील ताणतणाव, भावनिक प्रश्नांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र जबाबदार असेल

  • ग्रामीण, वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना सेवा देण्याची व्यवस्था

  • केंद्राचे काम संचालक किंवा अधिष्ठाता पदाशी समकक्ष असलेल्या मानसशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, सामाजिक शास्त्र अशा विषयांतील प्राध्यापक करतील.

  • एखाद्या उच्च शिक्षण संस्थेत संबंधित विषय उपलब्ध नसल्यास अन्य संस्था किंवा विद्यापीठांचे सहाकार्य घेता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT