Wardha School News  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Wardha School News : विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस उगविणार नव्या गणवेशाविना

नव्या आदेशानुसार अद्याप कारवाई नसल्याने राज्यात आशा धुसर

सकाळ वृत्तसेवा

Wardha News : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवी पाठ्यपुस्तके, गणवेश देण्याचा शासनाचा दंडक आहे. त्याकरिता समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत अनुदानाचे नियोजन करण्यात येते. नव्या शैक्षणिक संत्रात या नियमात बदल करण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गणवेशासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत ३०० रुपये प्रती विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होते. त्यातून विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर गणवेश मिळत होते.

या नियमात शासनाने बदल केले असून राज्यातील शाळांना गणवेश पुरविण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. शाळेचा गणवेश आणि स्काऊट गाईडच्या गणवेशाचा कापड या कंत्राटदाराकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर महिला बचत गटाकडून ते शिवून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा शनिवारी (ता. १५) सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस शिल्लक आहेत. तर विदर्भातील शाळा नऊ जुले २०२४ पासून सुरू होत आहे.

असे असताना अद्यापपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एकाही शाळेत जाऊन शिलाईचे काम करणाऱ्या संस्थेच्या कारागिरांनी लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे घेतलेली नाहीत. अशा परिस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील?

तसेच अंदाजे मापे गृहीत धरून गणवेश शिलाई केल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मापाचा गणवेश न मिळाल्यास पालकांच्या रोषाला स्थानिक शिक्षकांना सामोरे जावे लागणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या योजनेचे कार्यान्वयन व्यवस्थित सुरू असताना यावर्षी शासनाने गणवेश योजनेच्या कार्यान्वयनात विनाकारण बदल केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे.

स्काऊट -गाईड्सच्या गणवेशाचाही प्रश्न

गणवेशासह स्काऊट-गाईडचा गणवेश संबंधित महिला बचत गटाकडून शिलाई करून दिल्या जाणार असल्याचे नमूद आहे. याकरिता शाळांना स्काऊट-गाईडच्या गणवेशाचे कापड पुरविले जाणार आहे. त्यासाठी प्रती गणवेश शिलाईसाठी १०० रुपये व अनुषंगिक खर्चासाठी प्रती गणवेश १० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

नियमित गणवेश शिलाईसाठी महिला बचत गटाना एकत्रित मोठ्या सख्येने काम मिळाल्याने त्यानी १०० रुपयांत गणवेश शिलाईचे दर मान्य केले होते. परंतु, अगदी कमी सख्येने शाळेतील विद्यार्थी असल्याने अनेक शाळेत १५-२० किंवा त्यापेक्षा कमी अधिक सख्येने विद्यार्थी असल्यास केवळ १०० रुपयांत हाफ पॅन्ट, शर्ट, फुल पॅन्ट -शर्ट, सलवार-कमीज, स्कर्टची शिलाई कोणीही करून देणे शक्‍य नसल्याचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.

समग्र शिक्षा अभियानातून गणवेशाची योजना सुरळीत सुरू होती. यात बदल करून गणवेश वितरणाची पद्धत क्लिष्ट केली आहे. याचा त्रास शिक्षकांना सहन करावा लागणार आहे. खासगीतून होत असलेल्या या गणवेश वितरण योजनेत शिक्षकांना अलिप्त ठेवल्यास शिक्षकांना गावकऱ्यांच्या रोषापासून वाचता येईल.

—विजय कोंबे,राज्याध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षक समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

तो सरळ सरळ खोटं... गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नीलमने सोडलं मौन; म्हणते- ते सगळं फक्त

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

SCROLL FOR NEXT