School ZP Education Department esakal
एज्युकेशन जॉब्स

Nanded : आनंदाची बातमी! शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके; चार लाख पुस्तकांची मागणी

दरवर्षी जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते.

सकाळ डिजिटल टीम

शैक्षणिक साहित्यावरील खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च वाढत आहे.

नांदेड : समग्र शिक्षातंर्गत पहिली ते आठवीमध्ये शिकणारे बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये. शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, यासाठी शासनाकडून समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.

यंदाही शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे (Textbooks) वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (Zilla Parishad Education Department) केले आहे. त्यासाठी बालभारतीकडे तीन लाख ९९ हजार ८०८ मराठी, इंग्रजी आणि ऊर्दू पुस्तकांची मागणी केली आहे.

दरवर्षी जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यासाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग प्रत्येक वर्षी पाठ्यपुस्तकांची नोंदणी करत असते. यावर्षी ता. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.

School ZP Education Department

शिक्षण विभागाने त्याची तयारी आत्तापासून सुरु केली आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी तीन लाख ९९ हजार ८०८ पुस्तकांची मागणी केल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले आहे. त्यामध्ये मराठी आणि उर्दू माध्यमातील तीन लाख ५३ हजार ५५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शैक्षणिक साहित्यावरील खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च वाढत आहे. शासनाने विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना राबविली असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार असल्याने आमची चिंता दूर झाली आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ही एक चांगली योजना आहे.

-सिद्धेश्वर स्वामी, पालक.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील तीन लाख ५३ हजार ५५६ विद्यार्थ्यांना पुस्तके वितरीत करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळांपर्यंत पुस्तके पोहोचतील.

-डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी.

तालुकानिहाय विद्यार्थी संख्या

  • नांदेड - २० हजार ५२४

  • बिलोली - १७ हजार ७०६

  • धर्माबाद - १० हजार १९७

  • नायगाव - २१ हजार २१८

  • देगलूर - २५ हजार ४६४

  • अर्धापूर - १३ हजार ७७४

  • मुदखेड - १५ हजार ८००

  • किनवट - ३२ हजार २५५

  • माहूर - १३ हजार ९८७

  • हदगाव - ३४ हजार १२१

  • हिमायतनगर - १४ हजार ७

  • मुखेड - ३८ हजार ५४३

  • भोकर - १९ हजार २७९

  • उमरी - १३ हजार ७५६

  • कंधार - ३० हजार १५५

  • लोहा - ३२ हजार ७७

  • एकूण - तीन लाख ५३ हजार ५५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT