Make in India Sakal
एज्युकेशन जॉब्स

नोकरी/ बाजारपेठ : ‘मेक इन इंडिया’ने दिले उद्योगांना नवे आयाम

उद्योगांना अनुकूल परवानारहित (डी-लायसन्स) व नियंत्रण नसलेली (डी-रेग्युलेट) व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न सध्या सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- सुप्रिया बडवे

उत्पादन क्षेत्रात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. भारतात केवळ उत्पादनबरोबर अन्य क्षेत्रातही उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातून उद्योग-नोकरीच्या संधी वाढल्या आहेत.

उद्योगांना अनुकूल परवानारहित (डी-लायसन्स) व नियंत्रण नसलेली (डी-रेग्युलेट) व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्याचे दृश्य परिणाम आता उद्योग आणि गुंतवणूक वाढीतून दिसून येत आहेत. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत उत्पादनक्षेत्र, पायाभूत सुविधा, सेवा कार्य यातील २५ क्षेत्रे निवडली आहेत, यात तरुणांना अनेकविध संधी आहेत.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट भारतात अधिकाधिक वस्तूंचे उत्पादन करणे हे आहे. लोकांना कमी खर्चात वस्तू मिळाव्यात, यासोबतच परदेशी गुंतवणूक वाढावी हे या उपक्रमाचे हेतूही साध्य होताना दिसत आहेत. यातून मोठ्या आणि अनेक लघु उद्योगांना कामे मिळाली आहेत. लष्कर क्षेत्रासाठी लागणारी शस्त्रास्त्रे, सुटे भाग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

आतापर्यंत आपण लष्करासाठी लागणारी अनेक वाहने व त्यांचे सुटे भाग आयात करत होतो. त्यावर कोट्यवधी रुपये आयात शुल्क, कर द्यावा लागत होता. ‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे सध्या ही उत्पादने (वाहन व सुटे भाग), वेगवेगळी आयुधे वाजवी दरात आणि उत्कृष्ट गुणवत्तेसहित स्वतः भारतात निर्माण करीत आहोत. सरकारने उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळी अनुदाने (सबसिडी) दिली आहेत.

विविध करावर सवलती दिल्या आहेत. उद्योगाला पोषक असे वातावरण त्यातून निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्योजकांनी विशेषतः ज्यांना नवीन उद्योगात यायचे आहे, त्यांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन आपल्या उद्योगाला आणखीन समृद्ध बनवावे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रम २०२५पर्यंत भारताच्या सकल घरेलु उत्पादनात (जीडीपी) उत्पादन क्षेत्राचे योगदान १७ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत लक्षणीयरित्या वाढविण्याच्या तयारीत आहे. हा उपक्रम तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार आणि भारतातील सर्वांत लहान गावे आणि शहरांमध्ये आर्थिक प्रवेश सुनिश्चित करेल. यात नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी संधी शोधावी.

महिलांसाठी प्रोत्साहन

‘मेक इन इंडिया’मध्ये अनेक महिला उद्योजिका तयार झाल्या आहेत. महिला उद्योग विकास संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय किंवा उद्योग करणाऱ्या तरुणींना मार्गदर्शन करण्यावर आम्ही भर दिला आहे. महिला बहुआयामी, व्यवस्थापन कौशल्यांनी समृद्ध असतात. एखादा उद्योग सुरू करताना त्यासाठी लागणारे ज्ञान, कौशल्य, सातत्य या गोष्टींचा ठेवा महिलांकडे उपजतच असतो.

त्यामुळे अनेक महिलांनी उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘आम्ही उद्योगिनी’ सारखा उपक्रम यासाठी प्रोत्साहन देणारा ठरत आहे. एखाद्या उद्योग सुरू करणे सोपे असते, परंतु त्याला अपस्केलिंग करणे अवघड असते, यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे.

शेती, खाद्य, सेवा, रेस्टॉरंट, डायमंड, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटल सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रात 4M (मॅन, मनी, मटेरिअल आणि मशिन) खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी आवश्यक स्कील घ्यायला हवीत. कोणतेही क्षेत्र असो त्यासाठी चांगले मार्केटिंग स्कील, सोशल मीडियाचा योग्य वापर, आपल्या टार्गेट ग्रूपपर्यंत पोहोचणे ही कौशल्य असणे आवश्यक आहे.

(लेखिका ‘बेलराइज इंडस्ट्रीज’च्या कार्यकारी संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT