SWOT  
एज्युकेशन जॉब्स

Management Skills: हॉवर्ड विद्यापीठात लागला होता SWOTचा शोध

आपला व्यवसाय हा चार कसोटीवर कसा उतरतो आहे, याचं विचारपूर्वक विश्लेषण केल्यास त्यावर नियंत्रण आणणं सोपं जाईल.

सकाळ वृत्तसेवा

व्यवस्थापन करत असताना, एका महत्त्वाचं कौशल्य शिकून घ्यावं लागतं, ते म्हणजे SWOT विश्लेषण. SWOT म्हणजे Strength (सामर्थ्य), Weakness (दुर्बलता), Opportunities (संधी), Threat (धोका). म्हणायला गेलं तर हे एक ताकदीचं टूल आहे, व्यवस्थापनासाठी. यातील मेख अशी आहे की याचा परिणामकारक वापर करून घेण्यासाठी त्यामागचा विचार समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.

बाकीच्या व्यवस्थापकीय कौशल्यासारखं SWOTसुद्धा हॉवर्ड विद्यापीठात शोधलं गेलं असं म्हटलं जातं. आपला व्यवसाय हा चार कसोटीवर कसा उतरतो आहे, याचं विचारपूर्वक विश्लेषण केल्यास त्यावर नियंत्रण आणणं सोपं जाईल. यातील अनुभव असा आहे की, SWOT विश्लेषण करताना ते फार संदिग्ध स्वरूपात केलं जातं आणि त्यामागे स्पष्टता नसते. या कारणामुळे अनेक व्यवसाय त्याचा म्हणावा तसा परिणामकारक वापर करून घेत नाहीत. त्यामुळे तो शब्द फक्त एक व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील एक परिभाषा म्हणून प्रचलित आहे. पण त्यावर फारसं काम केलं जात नाही, असा माझा अनुभव आहे.

SWOT विश्लेषण करताना काही गोष्टी अत्यंत व्यापक स्वरूपात लिहिल्या जातात आणि त्यामुळे त्यावरून कृती काय ठरवायची, हे शोधता येत नाही. ज्या विश्लेषणातून कृती तयार होत नाही, तो प्रयोग करणे हा वेळेचा अपव्यय असतो. SWOT विश्लेषण करताना वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट लिहून काढल्यास त्या प्रत्येक विश्लेषणातून एक कृतिशील आराखडा बनण्याची शक्यता तयार होते.

सामर्थ्याची माहिती

स्ट्रेंथ लिहिताना अनेकदा व्यापक पद्धतीने लिहितो, ‘आमचे तांत्रिक ज्ञान चांगले आहे.’ या वाक्यरचनेतून विषयाचा आवाका समजला, परंतु त्याची वस्तुनिष्ठता, सांख्यिकी पायावर आपल्याला काय म्हणायचं आहे हे लक्षात येत नाही. हीच स्ट्रेंथ आपण प्रमाणबद्ध पद्धतीने लिहिली तर तिचा परिणाम वेगळा होऊ शकतो. उदाहरणार्थ : आम्ही आमच्या तांत्रिक ज्ञानाद्वारे पंधरा प्रकारचे उत्पादन करतो आणि येत्या तीन वर्षांमध्ये आम्हाला ती संख्या तीसपर्यंत न्यायची आहे. थोडक्यात आज बनवले जाणारे पंधरा प्रॉडक्ट्स हे आमचे सामर्थ्य आहे.

परंतु आमची मार्केटमधील पोझिशन अजून बळकट करण्यासाठी आम्हाला तीस वेगवेगळी उत्पादने आणणे ही काळाची गरज आहे. एकदा हे लिहून काढलं की पंधरा पासून तीसवर जाण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, या वेगवेगळ्या कृती लिहून काढता येतात. एकदा त्या लिहिल्या की मग त्याला टारगेट टाइम लाईन ठरवता येते आणि ते करण्यासाठी कोण जबाबदार आहे ते ठरवता येतं. हा कृतिशील आराखडा तयार झाला की पुनरावलोकन करण्याचा आराखडा तयार करता येतो. आपण ठरवलेल्या गोष्टी या वेळेत होत आहेत का, होत नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल यावर अभ्यास करता येतो.

याच धर्तीवर मग आपण आपल्याला व्यवसायाचे दुर्बल घटक, मार्केट मध्ये असणाऱ्या संधी आणि व्यवसायाला उभे राहणारे धोके याचं विश्लेषण करू शकतो. स्ट्रेंथ आणि विकनेस यावर आपण काम करून नियंत्रण आणू शकतो. बहुतेकदा संधी आणि धोके यावर आपले नियंत्रण नसते. याचा वापर जर व्यवस्थित केला तर व्यवसायाला अनिश्चततेपासून जे प्रश्न उद्‍भवतात त्याचे उत्तर शोधू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT