UPSC CAPF 2021: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (Central Armed Police Forces, CAPF) परीक्षेचा अर्ज मागे घेण्यासाठी लोकसेवा आयोगाकडून (Union Public Service Commission, UPSC) मंजुरी देण्यात आली आहे. तर, ज्या उमेदवारांनी अर्ज भरला असूनही परीक्षेस हजर राहण्याची इच्छा नाही, ते 18 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आपला अर्ज परत घेऊ शकतात. सीएपीएफचा अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना upsconline.nic अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यापूर्वी यूपीएससीने 15 एप्रिल रोजी UPSC CAPF 2021 चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला होता. तसेच परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 मे होती. (Take The Central Armed Police Force Exam Application Back CAPF)
UPSC CAPF 2021 : 'या' तारखा ठेवा लक्षात
सीएपीएफ नोटिफिकेशन 2021 - 15 एप्रिल 2021
यूपीएससी सीएपीएफ अर्ज भरण्यास प्रारंभ - 15 एप्रिल 2021
सीएपीएफ अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 5 मे 2021
सीएपीएफ अर्ज परत करण्याची तारीख - 12 ते 18 मे 2021
सीएपीएफ लेखी परीक्षेची तारीख - 05 मे 2021
UPSC CAPF 2021 : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा अर्ज मागे घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर upsconline.nic.in जा व यूपीएससी सीएपीएफ परीक्षा लिंक निवडा. त्यानंतर आता नवीन पृष्ठ उघडेल, जिथे उमेदवाराला आयडीसह नोंदणीकृत अर्जाची माहिती द्यावी लागेल. यामध्ये नाव मागे घेण्याची विनंती करताना उमेदवारांना मोबाइल नंबर आणि नोंदणीकृत ईमेल पत्ता द्यावा लागेल. यानंतर, मोबाईल नंबर व ईमेल पत्त्यावर ओटीपी स्वतंत्रपणे पाठविला जाईल आणि तीस मिनिटांसाठी तो वैध असेल. तसेच 18 मे रोजी (सायंकाळी 5:30 वाजता) यूपीएससी सीएपीएफ अर्ज परत करण्यासाठी ओटीपी स्वीकारला जाईल. त्यानंतरच अर्ज मागे घेण्याची विनंती मान्य केली जाईल.
इंडियन आर्मीच्या Common Entrance परीक्षा स्थगित; लष्कराचा महत्वपूर्ण निर्णय
Take The Central Armed Police Force Exam Application Back CAPF
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.