Tattoo On Body  sakal
एज्युकेशन जॉब्स

Tattoo On Body : सरकारी नोकरी हवीय? मग काढू नका टॅटू; वाचा काय आहे कारण?

भारतातील अनेक उच्च स्तरीय नोकऱ्यांमध्ये टॅटूबाबत खूप कडक नियम बनवले गेले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आजच्या फॅशनच्या जगात तरुणांमध्ये टॅटूची क्रेझ सुरू आहे. हे तरुण हात, पाय, पाठ अशा शरीराच्या विविध भागांवर टॅटू काढत आहेत, मात्र सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांनी टॅटू काढणे टाळावे, असे सांगितले जाते. कारण आपल्या देशात अनेक सरकारी नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये उमेदवाराच्या अंगावर टॅटू काढण्यास मनाई आहे.

दरवर्षी अनेक तरुण सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतात. नोकरी मिळवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. तसं पाहिलं, तर परीक्षा, मुलाखत किंवा मुलाखत चाचणी पास करून सरकारी नोकरी मिळणं अवघड तर आहेच, पण त्याचबरोबर त्यात टिकून राहण्यासाठी अनेक त्यागही करावे लागतात. भारतातील अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू काढण्यास बंदी आहे. आता तुम्हाला टॅटूची आवड असेल आणि सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्हाला टॅटूचा छंद सोडावा लागेल.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

भारतातील अनेक उच्च स्तरीय नोकऱ्यांमध्ये टॅटूबाबत खूप कडक नियम बनवले गेले आहेत. कोणत्या सरकारी नोकरीचे उमेदवार शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू बनवू शकत नाहीत. याचा अर्थ असा की, जर तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढला असेल तर तुम्ही मोठ्या सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकत नाही.

  • भारतीय प्रशासकीय सेवा- IAS

  • भारतीय पोलीस सेवा- IPS

  • भारतीय महसूल सेवा- IRS

  • भारतीय विदेश सेवा- IFS

  • भारतीय वायुसेना

  • भारतीय तटरक्षक

  • भारतीय सेना

  • भारतीय नौदल

  • पोलीस

'या' कारणामुळे टॅटू काढण्यास मनाई

या नोकऱ्यांच्या उमेदवारांच्या शरीरावर कोणताही टॅटू आढळल्यास नोकरीवर घेतले जात नाही. टॅटूमुळे अनेक प्रकारचे रोग होतात. त्यामुळे एचआयव्ही, त्वचारोग आणि हिपॅटायटीस ए आणि बी सारखे आजार होण्याचा धोका आहे.

काही लोकांचा असा विश्वास आहे की जो व्यक्ती शरीरावर टॅटू काढतो तो शिस्त पाळणार नाही. कामापेक्षा त्याचे छंद महत्त्वाचे असू शकतात, असा त्यांचा विश्वास आहे.

टॅटू गोंदवलेल्या व्यक्तीला सुरक्षा दलात नोकरी मिळू शकत नाही. कारण त्यांना पकडल्यास टॅटूवरून त्याची ओळख पटते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे चांगले नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT