Teacher Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Teacher Recruitment : शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा लागला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया थांबवावी लागली होती. परंतु निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळविण्यात आली होती. त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिवसानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती.

दरम्यान, विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम २४ मेला निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार २४ मे पासून या क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू केली आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर केला आहे. त्यावर कार्यवाही सुरू आहे. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता मिळाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आचारसंहितेमधून शिक्षक भरती प्रक्रियेतील यापूर्वीची निवड यादी आणि रूपांतरित जागांसंदर्भातील कार्यवाही करण्यास निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करत आहेत, हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. चुकीची माहिती पसरविणे आणि आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे, ही गंभीर बाब आहे, असेही मांढरे यांनी नमूद केले आहे.

सूट मिळविण्यासाठी प्रयत्न - मांढरे

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यात सूट मिळविण्यात आली होती. त्याप्रमाणेच यावेळी देखील शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT