आपल्या पाल्यांना रेग्युलर अभ्यासक्रमासोबत अबॅकस किंवा वैदिक गणित पद्धतीला पण महत्त्व दिले पाहिजे.
सोलापूर : सध्याची शिक्षण पद्धती पाहिली तर सर्व पालक आपल्या पाल्यांना रेग्युलर अभ्यासक्रम पूर्ण करून चांगले मार्क मिळवणे यावरच भर देत आहेत. त्यामुळे मुलांना मार्क तर भरपूर भेटतात, पण त्यांच्या बौद्धिक पातळीची क्षमता तेवढी भक्कम झाली का? हे बघत नाहीत. मग त्यासाठी काय केले पाहिजे? आपल्या पाल्यांना रेग्युलर अभ्यासक्रमासोबत अबॅकस (Abacus) किंवा वैदिक गणित पद्धतीला पण महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे काय होईल की वय वर्ष 6 ते 14 या कालावधीत जर तुम्ही तुमच्या मुलांना अबॅकस गणितीय पद्धती (Abacus mathematical method) शिकविण्यास सुरुवात केली तर त्यांच्या बुद्धीची पातळी, त्यांची क्षमता वाढ होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
तुम्हाला माहिती आहे, सध्या आपण डिजिटल कॅल्क्युलेटर (Digital calculator) वापरून गणितीय क्रिया काही सेकंदात करू शकतो. पण ते करीत असताना आपल्या मेंदूचा किती भाग वापरला गेला, याचा कधी विचार केलाय का नाही? काहीच भाग वापरला गेला नाही. पण जर तुम्ही तुमच्या पाल्यांना अबॅकस शिकवत असाल तर त्याच्या मेंदूच्या दोन्ही भागांचा म्हणजे डाव्या व उजव्या भागाचा नक्कीच विकास होईल तो कसा? तुम्हाला माहिती आहे. आपल्या मेंदूचा उजवा भाग हा चित्र काढणे, रंगविणे, गाणे म्हणणे, डान्स करणे, म्हणजे काही क्रिएटिव्ह क्रिया करण्यासाठी आग्रही असतो तर मेंदूचा डावा भाग हा आकडेमोड करण्यासाठी म्हणजेच गणितीय क्रिया करण्यासाठी आग्रही असतो.
जर तुम्ही तुमच्या पाल्यांना वय वर्ष 6 पासून अबॅकस शिकवण्याचा प्रयत्न करीत असाल तर काही कार्यात कालांतराने तो आपल्या मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करेल. तो कसा? जसा अबॅकस शिकत असाल तर तसेच काही दिवसांनी तो आपल्या मनामध्येच अबॅकस किटचा वापर करेल व गणितीय क्रिया करेल म्हणजे तो एकाचवेळी डावा भाग उजव्या भाग याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास शिकेल. म्हणजेच काय व्हिज्युअलायझेशन पावर वाढेल. अबॅकसचे महत्त्व हे सध्याच्या स्पर्धेच्या युगात सर्वजण स्पर्धा परीक्षांमध्ये गणित व बुद्धिमत्ता महत्त्वाचा भाग झालेला आहे. जर विद्यार्थ्यांनी परीक्षेत कमी वेळेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडविले तर त्याला सरकारी नोकरी किंवा इतर ठिकाणी नोकरीचे जसे की, आयटी जॉब्स लवकर मिळवता येतात.
अबॅकसमध्ये दोन पद्धतीच्या असतात. एक जापनीज व दुसरी चायनीज. त्यापैकी आपण जापनीज पद्धती नेहमी वापरतो. पूर्ण जापनीज पद्धत शिकण्यासाठी आपल्याला 24 महिने लागतात. म्हणजे त्याच्या जवळपास आठ ते दहा लेव्हल आहेत आणि जर तुमचा पाल्य हे शिकत असेल तर त्यांच्यासाठी हे दुसरे-तिसरे काही नसून, ही फक्त गणितीय गंमत आहे. पाल्याच्या भविष्यासाठी तुम्ही नक्कीच हे पाऊल उचलले पाहिजे.
ठळक बाबी...
- अबॅकस म्हणजे शालेय गणिताचा क्लास नव्हे
- अबॅकस म्हणजे थोडक्यात मण्याची पाटी
- अबॅकस शिकल्याने मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ
- एकाग्रता वाढण्यास होते मदत
वयाच्या सहा वर्षांपासून अबॅकस शिकविले पाहिजे. जेणेकरुन पुढील शिक्षणासाठी मुलांच्या गुणवत्तेत बरीच प्रगती होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षततेतदेखील वाढ होण्यास याचा चांगला उपयोग होतो.
- प्रा. अजित ओहोळ, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.