CBSE Esakal
एज्युकेशन जॉब्स

कोरोनाचा पराभव करण्यासाठी 'सीबीएसई'ने राबविली यंग वॉरियर मोहीम

कोरोनाचा पराभव करण्यासाठी सीबीएसई बोर्डाने राबविली "यंग वॉरियर' मोहीम

श्रीनिवास दुध्याल

सीबीएसईच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरात "कोव्हिड-19'चा सामना करण्यासाठी "यंग वॉरियर' ही नवीन मोहीम सुरू केली आहे.

सोलापूर : कोरोना (Covid-19) विषाणूची दुसरी लाट संपूर्ण देशात पूर्णपणे कमकुवत झाली नाही. दररोज दोन लाखांहून अधिक प्रकरणे दाखल केली जात आहेत. अशा परिस्थितीत या साथीचा प्रतिबंध करण्यासाठी व युद्धपातळीवर जनजागृती अभियान (Awareness campaign about Corona) राबविण्यात येत आहे. या अभियानात आता सीबीएसई बोर्डानेही (CBSE Board) पुढाकार घेतला आहे. सीबीएसईच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरात "कोव्हिड-19'चा सामना करण्यासाठी "यंग वॉरियर' (Young Warrior) ही नवीन मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर एएनआयनेही यासंदर्भात ट्विट केले आहे. (The CBSE board launched the "Young Warrior" campaign to defeat Corona)

या चळवळीत विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी व्हावे, याबाबत मंडळाने संबंधित शाळांना पत्र पाठविले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट पाच दशलक्ष तरुणांना जोडणे आहे. त्याच वेळी असेही म्हटले आहे, की 50 दशलक्ष लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे.

सीबीएसई यंग वॉरियर चळवळ युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व युवा-युनिसेफ आणि 950 मल्टी स्टॉकधारकांच्या मदतीने आयोजित केली जाईल. त्याच वेळी, कोणीही विद्यार्थी किंवा शिक्षक या आंदोलनात सामील होऊ शकतात. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी आपले वय 10 ते 30 वर्षे दरम्यान असावे हे लक्षात ठेवले पाहिजे.

असा करा अर्ज

या चळवळीत सामील होण्यासाठी विद्यार्थी +91 9650414141 या क्रमांकावर YWA लिहून व्हॉट्‌सऍप करू शकतात. याव्यतिरिक्त 08066019225 वर वैकल्पिकरीत्या मिस कॉल करू शकतात. विद्यार्थी या चळवळीत सामील झाल्यानंतर दहा किंवा त्यापेक्षा अधिक तरुणांना चळवळीत सामील होण्यास प्रेरित करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT