दत्तात्रय भरणे/MPSC Sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC : मागणीपत्रासाठी आता डिसेंबरची मुदत! सरसकट वयोमर्यादा वाढ नाहीच

MPSC : मागणीपत्रांसाठी आता डिसेंबरची मुदत ! सरसकट वयोमर्यादा वाढणार नाहीच

श्रीनिवास दुध्याल

बहुतेक विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे दिली नसल्याने ही मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढविल्याचे भरणे यांनी सांगितले.

सोलापूर : राज्य शासनाच्या 43 विभागांमध्ये सद्य:स्थितीत अडीच लाखांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. त्यापैकी जवळपास 19 हजार पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission - MPSC) माध्यमातून होईल, असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी यापूर्वीच जाहीर केले. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी 31 ऑक्‍टोबरपर्यंत आयोगाला मागणीपत्र सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. मात्र, बहुतेक विभागांनी मागणीपत्रे दिली नसल्याने ही मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढविल्याचे भरणे यांनी सांगितले.

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दोन वर्षे परीक्षाच घेता आली नाही. त्यामुळे वयोमर्यादेच्या काठावरील उमेदवारांची चिंता वाढली. खूप प्रयत्न केल्यानंतर आता यश मिळेल, या आशेतून त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. त्याच 'एमपीएससी'च्या उमेदवारांच्या अडचणी सोडविल्या जातील, अशी ग्वाही यापूर्वीच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो वा राज्यमंत्री भरणे यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी, ज्यांची वयोमर्यादा संपुष्टात येईल, त्यांना वाढीव संधी देण्यासंदर्भात वारंवार ग्वाही दिली. मात्र, अजूनपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, राज्यातील सुशिक्षित तरुणांना सरकारी नोकरी मिळावी, या हेतूने पदभरतीवरील निर्बंध काही प्रमाणात वित्त विभागाने शिथिल केले. त्यानुसार गट- ब व गट- क संवर्गाची पदभरती 'एमपीएससी'मार्फत केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यात महसूल, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास, गृह विभाग, आरोग्य, मेडिकल यासह इतर काही महत्त्वाच्या विभागांमधील 19 हजार पदांचा समावेश आहे. आतापर्यंत साडेआठ हजार पदांची मागणीपत्रे आयोगाला पाठविण्यात आली असून उर्वरित मागणीपत्रांसाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्र्यांनी अनेक आश्‍वासने दिली; परंतु त्यानुसार कार्यवाही झालीच नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागांमधील जवळपास 19 हजार रिक्‍त पदांची भरती केली जाणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे सर्व विभागांचे मागणीपत्र आयोगाला पोचलेली नाहीत. परंतु, डिसेंबरपर्यंत सर्व विभागांची मागणीपत्रे आयोगाला पाठविली जातील आणि त्यानंतर लगेचच पदभरती होईल. वयोमर्यादा वाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून त्यावर अजून निर्णय झाला नाही, परंतु सकारात्मक तोडगा निघेल.

- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

'गृह'चीच वाढणार वयोमर्यादा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताना अपयशानंतरही नव्या जोमाने परीक्षेची तयारी करणाऱ्या काही उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे, तर काहींची वयोमर्यादा यावर्षी संपुष्टात येईल. त्यांच्या वयोमर्यादेत एक-दोन वर्षांची वाढ करावी, ही मागणी सातत्याने केली जात आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. परंतु, त्यावर अजूनपर्यंत काहीच निर्णय झालेला नाही. दरम्यान, सर्वच पदांची वयोमर्यादा वाढविणे अशक्‍य असल्याने पीएसआय, डीवायएसपी या पदांचीच वयोमर्यादा वाढेल, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा उमेदवार आक्रमक होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT