meditation sakal
एज्युकेशन जॉब्स

मनन-चिंतनाची सवय

डॉ. मिलिंद नाईक

स्वतःच स्वतःचे निरीक्षण करणे अवघड असते, कारण ज्याचे निरीक्षण करायचे आणि जो निरीक्षण करणार तो या दोन्ही गोष्टी एकच आहेत. अशा वेळी आपल्याबद्दलच्या निरीक्षणासाठी मित्र, नातेवाईक, शिक्षकांकडून माहिती मिळविणे किंवा ध्वनिमुद्रण अथवा चित्रीकरणासारखे मार्ग वापरून स्वतःच स्वतःचे परीक्षण करणे असे मार्ग उपयोगी ठरतात.

बाह्य घटकांची मदत घेऊन आपल्या स्वतःबद्दलची निरीक्षणे मिळवता येतात. हे जणू काही आरशात प्रतिबिंब पाहण्यासारखे, पण प्रत्येक वेळी बाह्य घटक अथवा व्यक्ती मदतीला असतेच असे नाही आणि असलीच तर ती प्रत्येक वेळी असेलच असं नाही.

त्यामुळे चांगले आत्मपरीक्षण करायला शिकणे हाच खरा उपाय. त्यातील एक म्हणजे दैनंदिनी लेखन होय, पण दैनंदिनी लेखनासारखं तंत्र हे शेवटी घडून गेलेल्या घटनांचे पुनश्च आठवून केलेले परीक्षण असते आणि त्यासाठी लागते ते उत्तम चिंतन आणि मनन ! शेवटी चांगल्या चिंतन-मननाचेच रूपांतर चांगल्या दैनंदिनी लेखनात होत असते. मग हे करावे कसे?

मनन-चिंतनाचा अर्थ

मनन म्हणजे घडलेल्या घटनांची उजळणी करणे, जेणेकरून ती विसरली जाणार नाही, तर चिंतन म्हणजे चिकित्सक विचार करणे. मननाने घडलेल्या घटना वाटलेले परिणाम साठवून ठेवले जातात. घटना घडली की, त्याचा आपल्या मन व बुद्धीवर काही ना काही परिणाम होतोच. त्यातील काही खोल असतात, तर काही उथळ! हा परिणाम टिकवून ठेवला तरच त्यावर नंतर अधिक खोलवर चिंतन करणे शक्य होते.

एखादी गोष्ट अशीच का घडली? त्यातील कार्यकारण संबंध काय? परिणाम करणाऱ्या एखाद्या घटकाचा बदल केला असता परिणाम काही वेगळाच आला असता का? असे एखाद्या घटनेबद्दल चिकित्सक विचार करणे म्हणजे चिंतन. सर्वसाधारणपणे चिंतन-मनन हे जोड शब्द म्हणून एकत्रच वापरले जातात.

प्रक्रिया

दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला योग्य वाटणाऱ्या देवतेचे स्मरण करून अथवा तसे नसल्यासही स्वतःला शांत करून, चित्ताची एकाग्रता साधून एकांतात ध्यान करावे. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आणावे. रागाच्या भरात अथवा आनंदाच्या भरात केलेले आत्मनिरीक्षण चुकू शकते. शक्यतो पहाटेच्या वेळी का? तर, तेव्हा विश्रांती होऊन भावना स्थिरावलेल्या असतात आणि आजूबाजूलाही शांतता असल्याने बाह्य चेतकांमुळे नवीन भावना निर्माण होण्याची शक्यता कमी असते.

मन स्थिर राखण्यास मदत होते. मन स्थिर झाल्यानंतर काय करायचे? तर, स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायचे. मी काल काय करायचे ठरवले होते? त्यातील काय साध्य होऊ शकले? कोणत्या गोष्टी साध्य होऊ शकल्या नाहीत. ज्या साध्य झाल्या त्या का झाल्या? त्यातून माझ्यातील कोणती बलस्थाने प्रकट होतात? ज्या साध्य झाल्या नाहीत, त्यातून माझी कोणती मर्मस्थाने लक्षात येतात?

जे यशस्वी करू शकलो किंवा करू नाही शकलो तो केवळ योगायोग होता की, जे घडले ते नक्कीच माझ्यातल्या गुण-अवगुणांमुळे घडले? माझ्यातल्या दौर्बल्यामुळे जर एखादी गोष्ट मी करू शकलो नसेल, तर ते दौर्बल्य दूर कसे करता येईल? अशा सर्व गोष्टींवर मनन-चिंतन करावे.

याशिवाय कोणती दौर्बल्ये अशी आहेत की, ज्यात सुधारणा करताच येणार नाहीत आणि कोणती दौर्बल्ये अशी आहेत की, ज्यात प्रयत्नपूर्वक सराव करून बदल घडवता येईल? उदाहरणार्थ - जन्मतःच असलेल्या स्नायूंमधील बिघाडामुळे तोतरेपण असेल, तर त्यावर मात करणे अवघड आहे. मात्र, सभेत वक्तृत्वाची भीती वाटल्याने तोतरेपणा येत असेल, तर तो सरावाने घालवता येईल.

अशा सर्वच दुर्बलतेची दखल घ्यायला हवी की, ज्या घेऊनच पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे जीवनकार्य निवडताना त्याची दखल घेतली पाहिजे. पाय सपाट (फ्लॅट फूट) आहे आणि सैन्यदलात अधिकारी व्हायचे आहे हे शक्य नाही. त्यामुळे उगाचच ती इच्छा ठेवून चालणार नाही.

याशिवाय काय करायचे? तर, भविष्यवेध घ्यायचा. आज मी काय नियोजन करणार आहे? कालच्या चुका टाळून पुढे कसे जाता येईल, असा विचार करावा. याशिवाय आजूबाजूला कोणत्या घटना घडत आहेत? यातील कोणत्या गोष्टी मला फायदेशीर आहेत? कोणत्या गोष्टी माझ्यासाठी कठीण, त्रासदायक आहेत? याही गोष्टींवर चिंतन करावे. अशा केलेल्या वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षणाने योग्य व अनुरूप जीवनकार्य निवडणे अधिक सोपे जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT