इंडियन एअर फोर्स esakal
एज्युकेशन जॉब्स

इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाइंग ब्रॅंच व ग्राउंड ड्यूटी पदांची भरती

सरकारी नोकरी! इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाइंग ब्रॅंच व ग्राउंड ड्यूटी पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा

IAF ने फ्लाइंग ब्रॅंचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि ग्राउंड ड्यूटीमध्ये पर्मनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सोलापूर : भारतीय हवाई दलात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची (Government Job) संधी चालून आली आहे. इंडियन एअर फोर्स (Indian Air Force - IAF) ने फ्लाइंग ब्रॅंचमध्ये (Flying Branch) शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि ग्राउंड ड्यूटीमध्ये (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक दोन्ही) पर्मनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या 317 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. IAF द्वारे एम्प्लॉयमेंट न्यूज वीकमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, या सर्व पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड वायू सेनेद्वारे घेण्यात येणाऱ्या एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट (Air Force Common Admission Test - AFCAT) द्वारे केली जाईल. हवाई दलाकडून जानेवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये AFCAT 01/2022 बॅच आणि NCC स्पेशल एंट्रीमधून अर्ज आणि निवड प्रक्रिया केली जाईल.

जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

AFCAT 01/2022 बॅच आणि NCC स्पेशल एंट्रीसाठी अर्जाची प्रक्रिया हवाई दलाकडून 1 डिसेंबरपासून सुरू केली जाईल आणि उमेदवार AFCAT अधिकृत पोर्टल afcat.cdac.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2021 निश्‍चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जादरम्यान, उमेदवारांना 250 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल, जे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून भरू शकतील. एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही.

जाणून घ्या पात्रता व निकष

एएफसीएटी बॅच 01/2022 हवाई दलाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार, फ्लाइंग ब्रॅंचसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 20 वर्षे ते 24 वर्षे असावे, म्हणजेच 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2003 दरम्यान जन्मलेले असावेत. त्याच वेळी, AFCAT ग्राउंड ड्यूटी ब्रॅंचसाठी वयोमर्यादा 20 ते 26 वर्षे आहे. दोन्ही प्रकारच्या प्रवेशासाठी उमेदवारांना वयोमर्यादेच्या अटी तसेच विहित शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक निकषांची पूर्तता करावी लागेल, जे हवाई दलाने जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटवरील AFCAT 01/2022 च्या तपशीलवार अधिसूचनेवरून कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT