Nine Aspects of Career Development sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर विकासाचे नऊ पैलू

नऊ पैलूंचा विचार करून त्यावर योग्य ते काम केल्यास निश्‍चितच अपेक्षित बदल घडून येतील.

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रात देवीच्या नऊ रूपाची पूजा, आराधना केली जाते. त्या निमित्ताने करिअरसाठी आवश्‍यक असलेल्या नऊ पैलूंचे महत्त्व जाणून घेऊया. ह्या नऊ पैलूंचा विचार करून त्यावर योग्य ते काम केल्यास निश्‍चितच अपेक्षित बदल घडून येतील -

१ . शैलपुत्री

नवीन सुरुवात - निर्दोषता,

शुद्धता आणि वाढीची सुरुवात

लक्षात ठेवा, प्रत्येक प्रवास एका पायरीने सुरू होतो. आव्हाने स्वीकारा, अडथळ्यांमधून शिका आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. उच्च ध्येय ठेवा. जीवनात अधिक यश, उंची प्राप्त करण्याची इच्छा बाळगा. तुम्ही महत्त्वाकांक्षी असाल, तर तुमची उद्दिष्टेही नक्कीच मोठी असतील. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही मर्यादांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कराल. योग्य तिथे परिवर्तनही कराल.

२. ब्रह्मचारिणी

शिस्त आणि समर्पण

अडथळे दूर करण्यासाठी स्वयंशिस्त जोपासा. स्वतःला ध्येय आणि मूल्यांसाठी समर्पित करा. मनःशांती मिळविण्यासाठी समर्पण वृत्ती ठेवा. संयम बाळगा आणि स्वतःच्या अतिविचारांवर, भावनांच्या उद्रेकावर नियंत्रण मिळवण्याचा सराव करा.

३. चंद्रघंटा

धैर्य आणि निश्‍चय

धैर्य आणि दृढनिश्चय हे दोन इंजिने आपल्या गाडीला यशाकडे नेतात. आव्हानांचा सामना करताना हे दोन गुण आपल्याला खूप मदत करतात. तुमच्यात हिंमत असेल, तर तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करू शकता.

४. कुष्मांडा

सर्जनशीलता आणि आरोग्य

सर्जनशीलता आणि निरोगी राहणे हे परिपूर्ण जीवनाचे महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे आपल्या मनाचे, शरीराचे आणि आत्म्याचेदेखील पोषण होते. आपण अधिक सक्षम होतो, मानसिकदृष्ट्या खंबीर होतो. शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. भावनिकरीत्या आपण अधिक सजग व संवेदनशील होतो.

५. स्कंदमाता

पालनपोषण आणि संरक्षण

निःस्वार्थ प्रेम करा आणि इतरांचीही काळजी घ्या. ज्यांना गरज आहे त्यांचे संरक्षण करा. जे चांगले आहे, त्याचे समर्थन करा. नातेसंबंध जोपासा. माणसे जोडून ठेवा. यांमुळे तुमची प्रगती होण्यास मदत होईल.

६. कात्यायनी सामर्थ्य आणि ज्ञान तुमची पूर्ण क्षमता ‘अनलॉक’ करून तुम्ही तुमचे सामर्थ्य वाढवा. ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आवश्‍यक तेवढी मेहनत घ्या. ज्ञानाचा योग्य वापर केल्यास यश मिळतेच. ७. कालरात्री परिवर्तन आणि सकारात्मकता नकारात्मकता दूर करणे फार गरजेचे आहे. जीवनात सकारात्मक विचारांना खूप महत्त्व आहे. काही वेळा असं होतं की, आपण नकारात्मक विचारांच्या आधीन जातो. मात्र, विचारांवर मात करणं आणि सकारात्मक कृती करणं खूप गरजेचं आहे.

८. महागौरी

सशक्तीकरण आणि आत्मविश्वास

सशक्तीकरण आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी तुम्हाला अधिक गतिमान करतात. त्यामुळे मानवी क्षमता वाढते. मर्यादांमधून बाहेर पडण्यास मदत होते आणि भीतीपासून मुक्तता मिळते. लवचिकता आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करता येतो.

९. सिद्धिदात्री

आध्यात्मिक वाढ आणि पूर्तता

नवमी हा नवरात्रीचा नववा दिवस असतो. तो ज्ञान आणि आत्मविश्वासाचे एकत्रीकरण, परिपक्वता प्राप्त करणे, स्व-स्वरूपाची जाणीव होणे आणि जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करणे याचे प्रतीक मानला जातो. नवरात्रोत्सव साजरा करताना, या पैलूंवर चिंतन करू आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहूया !

(प्रणव राजा मंत्री)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT