NEET चे 16 लाख विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
सोलापूर : NEET ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आज संपू शकते. NEET निकाल आणि फायनल अॅन्सर की NTA NEET वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध केली जाऊ शकते. NEET चे 16 लाख विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर NTA 2-3 दिवसांत निकाल जाहीर करेल, अशी अपेक्षा होती; पण अजूनही प्रतीक्षा सुरू आहे. NEET परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन घेण्यात आली होती.
NEET चा निकाल असे तपासा...
स्टेप 1 : प्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : 'NEET निकाल' या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : विनंती केलेली माहिती भरा.
स्टेप 4 : निकाल तुमच्या समोर असेल.
स्टेप 5 : ते डाउनलोड करा.
स्टेप 6 : भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेण्यास विसरू नका.
या दोन संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील
Neet.nta.nic.in
Ntaresults.nic.in
NEET 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी समुपदेशनाच्या वेळेवर अपडेटसाठी खालील वेबसाइट तपासावी
www.mohfw.gov.in
www.ayush.gov.in
dghs.gov.in/content/1344_1_MedicalEducation.aspx
mcc.nic.in/UGCounselling
यावर्षी NEET UG परीक्षेचा निकाल B.Sc नर्सिंग आणि B.Sc लाईफ सायन्सेसच्या प्रवेशासाठी वापरला जाईल.
NEET 2021 च्या निकालाच्या आधारे मेडिकल कौन्सिल कमिटी (MCC) राज्य सरकारच्या MBBS, BDS, AYUSH, BVSC, AH, BSc नर्सिंग कोर्समध्ये 15 टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांवर प्रवेश देते. उर्वरित 85 टक्के जागांवरील प्रवेश हे राज्य कोट्याशी संबंधित राज्यांच्या प्राधिकरणाद्वारे केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.