Clinical Psychologists esakal
एज्युकेशन जॉब्स

'क्लिनिकल सायकॉलॉजी'त करिअर बनवायचं आहे?

बाळकृष्ण मधाळे

सातारा : 'क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट' (Clinical Psychologists) (मानसशास्त्रज्ञ) लोकांना त्यांचे विचार आणि वागण्यात सकारात्मक बदल करण्यास मदत करतात. ते प्रथम आपल्या क्लायंटचे विचार आणि आचरण समजून घेतात आणि त्यानंतरच त्यांच्या मानसिक समस्येचे निराकरण करतात. लोकांनी मानसिक अडचणींवर मात करुन सुंदर जीवन जगावे, असे आपल्याला वाटत असेल, तर यात करिअर करण्याची चांगली संधी आहे. मात्र, यासाठी आपल्याकडे चांगले कम्युनिकेशन असणे आवश्यक आहे, शिवाय समोरच्याचे म्हणणे ऐकण्याचे कौशल्ये देखील आपल्यात असायला हवीत, तरच यात आपण सुंदर करिअर घडवू शकता. (There Are Lots Of Opportunity In Clinical Psychology)

'क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट' (मानसशास्त्रज्ञ) लोकांना त्यांचे विचार आणि वागण्यात सकारात्मक बदल करण्यास मदत करतात.

आपण कोणता अभ्यास कराल?

पदव्युत्तर शिक्षणात विद्यार्थ्यांना मानसशास्त्राच्या मूलभूत गोष्टी शिकविल्या जातात. यासाठी इंटर्नशिपची देखील सुविधा आहे. जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमात मानसशास्त्र हा मुख्य विषय नसला तरी, विविध विषयांचे विद्यार्थी पदवीधर कार्यक्रमात या विषयाचा समावेश करुन घेतात. दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर, क्लिनिकल सायकाॅलॉजीच्या क्षेत्रात अभ्यास केला जाऊ शकतो. यात विवाह आणि कुटुंबाशी संबंधित समस्यांचे समुपदेशन करणे किंवा उद्योग आणि संस्थात्मक मनोचिकित्साशी संबंधित लोकांना सामोरे जाण्यात मदत करणे यांचा समावेश आहे.

आपल्याला काय करावे लागेल?

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञांना एका विशिष्ट ग्राहक गटासोबत कार्य करावे लागते. त्यात काही शिकण्यास असमर्थ असलेले लोक, मुले यांचा समावेश आहे. शिवाय, त्यांना रुग्णालये किंवा इतरत्रही काम करावे लागते. मानसशास्त्रीय चाचण्या, मुलाखती आणि व्यावहारिक वागणूक यांच्यासंबंधी थेट निरीक्षणाद्वारे बर्‍याच ग्राहकांच्या गरजा, क्षमता आणि वर्तन यावरती मूल्यांकन करावे लागते. त्यानंतर ग्राहकांसाठी थेरपी, समुपदेशन इत्यादींवर उपाय सुचवतात. चिंता, उदासीनता, व्यसनमुक्ती, सामाजिक आणि वैयक्तिक समस्या यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी थेरपी आणि उपचार देखील मानसशास्त्रज्ञ सुचवतात.

clinical psychologists

करिअरची शक्यता

बर्‍याचदा क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट स्वत: चे क्लिनिक चालवतात किंवा ग्रुप प्रॅक्टिस करतात. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ म्हणून आपण रुग्णालयातही काम करू शकता. तेथे आपण मुले, कर्करोगाचे रुग्ण किंवा वृद्धांवर उपचार करु शकता. याशिवाय फॉरेन्सिक क्षेत्रातही आपण करिअर बनवू शकता. अशा व्यावसायिकांना क्लिनिकल फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ म्हणतात. जे गुन्हेगारांच्या आकलन क्षमतेबाबत त्वरित निर्णयही घेऊ शकतात. न्यायालय कसे कार्य करते आणि कायदेशीर प्रक्रिया कशी असते, यावरती देखील त्यांचा चांगला अभ्यास असतो. क्लिनिकल स्पोर्ट्स मानसशास्त्रज्ञ खेळाडूंशी संबंधित आहे. खेळाडूंना मानसिक रोगांवर मात करण्यासाठी आणि त्यांचे उद्दिष्ट साधण्यात मदत करण्यासाठी क्लिनिकल क्रीडा मानसशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरते.

clinical psychologists

कोर्स

बाल मानसशास्त्रज्ञ (Child Psychologist)

फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ (Forensic Psychologist)

हॉस्पिटलमधील सिनिअर मानसशास्त्रज्ञ (Senior Psychologist in hospital setting)

डोमेस्टिक वायलेंन्स मानसशास्त्रज्ञ (Domestic Violence Psychologist)

चाइल्ड अब्यूज मानसशास्त्रज्ञ (Child Abuse psychologist)

आरोग्य मानसशास्त्रज्ञ (Health Psychologist)

सैन्य मानसशास्त्रज्ञ (Military Psychologist)

तुरुंगातील मानसशास्त्रज्ञ (Prison Psychologist)

सब्सटेंस अब्यूज मानसशास्त्रज्ञ (Substance Abuse Psychologist)

मूड डिसऑर्डर मानसशास्त्रज्ञ (Mood Disorder Psychologist)

क्रीडा मानसशास्त्रज्ञ (Sports Psychologist)

संशोधन मानसशास्त्रज्ञ (Research Psychologist)

मानसशास्त्र प्राध्यापक (Professor of Psychology)

clinical psychologists course

कौशल्य

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट होण्यासाठी आपल्याकडे 'ही' पात्रता असणे आवश्यक.

-उत्तम संवाद आणि ऐकण्याचं कौशल्य

-संकटात सापडल्यांसाठी मदत करण्याची क्षमता

-प्रामाणिकपणा आवश्यक

-तणावग्रस्त परिस्थितीतही शांत राहण्याची क्षमता

-संघासोबत चांगले काम करण्याची आवड

-समस्येचे निराकरण आणि निर्णय घेण्याची पात्रता आवश्यक

प्रमुख संस्था

  • मुंबई विद्यापीठ

  • दिल्ली विद्यापीठ

  • NIMHANS, बंगळुरू

  • आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली

  • Gauhati विद्यापीठ, आसाम

  • मानसशास्त्र विभाग, रांची विद्यापीठ

  • रांची, झारखंड

There Are Lots Of Opportunity In Clinical Psychology

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT