career options after coronavirus  Google
एज्युकेशन जॉब्स

कोरोना संकटानंतर हे असतील करियरचे बेस्ट पर्याय

सकाळ डिजिटल टीम

कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. नुकतीच कोरोनव्हायरसची दुसरी लाट ओसरत असताना काही उद्योग पुन्हा सुरु केले जात आहेत. परीस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. या संकाटाच्या काळात अनेकांनी त्यांची नोकरी गमावली आहे. त्यामुळे येत्या काळात करियर आणि नोकरीसंदर्भात विचार मनात येऊ शकतात. बरेच जण येत्या काळात करियर बद्दल निर्णय घेणार आहेत. आज आपण या कोरोनाच्या संकटानंतर करियरच्या कोणत्या संधी असतील या बद्दल जाणून घेणार आहोत. (these are the best career options after coronavirus time)

ई-कॉमर्स

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरांमध्ये अडकून पडले होते. या काळात बहुतेक लोक ऑनलाईन स्टोअरमधून किराणा खरेदी करु लागले आहेत. लॉकडाउननंतर लोकांना होम डिलिव्हरी करण्यास सुरवात झाली आहे. लोकांची किराणा खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सवय या काळात मोडली आहे. हीच गोष्ट इतरही सेवांबाबत लागू होते. लोक त्यांना हव्या असलेल्या सेवा या ऑनलाईन स्वरुपात मिळवत आहेत. त्यामुळे ऑनलाइन सेवा देणाऱ्या बर्‍याच मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांची संख्या वाढविली आहे. ई-कॉमर्समध्ये नसलेल्या बर्‍याच इलेक्ट्रॉनिक कंपन्याही यासाठी तयारी करीत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तुमचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करू शकता. येत्या काळात या क्षेत्रात नक्कीच चांगल्या संधी उपलब्ध असतील.

डिजिटल मार्केटिंग

कोरोना माहामारीच्या काळात सगळे घरातच बसून असल्याने इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे. या काळात सगळी कामे डिजीटली केली जात आहेत. इतकेच नाही तर चेस टूर्नामेंटपासून ते लाइव्ह कॉन्सर्ट देखील डिजिटल पद्धतीने आयोजित केल्या जात आहेत. मुलाखती, मिटींग्स हे देखील सोशल मिडीयावर लाईव्ह स्ट्रिम केले जाते. त्यामुळे प्रत्येकालाच या काळात डिजिटल ओळख निर्माण करणे गरजेचे झाले आहे. अशा परिस्थितीत आपणास आपले भविष्य सोशल मीडिया मार्केटींग, सर्च इंजिन मार्केटींग किंवा ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप मार्केटींगमध्ये चांगले करियर घडवू शकता.

ऑनलाईन शिक्षण

लॉकडाऊनमध्ये शिक्षण देण्याची पारंपारिक पध्तत पुर्णपणे बदलून गेली आहे, आता शिक्षणासाठी शाळेत जाण्याची गरज उरलेली नाही. विद्यार्थी त्यांच्या घरातूनच ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहेत. या क्षेत्रात देखील तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. तुम्ही ऑनलाईन ट्यूशनच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय उभा करु शकता. याबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या शहर आणि देशापुरते मर्यादीत राहाणार नाहीत. ऑनलाईन शिक्षणपध्दतीत जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे शक्य होईल.

हेल्थ केयर

या क्षेत्रात तर नेहमीच आफाट संधी उपलब्ध आहेत. कोरोना महामारीने आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे महत्व अधोरेखित केले आहे. या महामारीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्व वाढले आहे. आरोग्य सेवेतील कोणत्याही क्षेत्रात आपली कोणतीही आवड जुळत असेल तर तुम्ही देखील या क्षेत्रात करियर करण्याचा विचार करु शकता.

टेक्निकल जॉब

कोरोनामुळे बऱ्याचशा आयटी कंपन्यांमधील कर्मचारी वर्क फॉर्म होम करत आहेत. तुम्हाला देखील घरातून काम करायला आवडत असेल तर तुम्ही देखील आयटी क्षेत्रात करियरचा विचार करु शकता. इंटरनेटच्या वापरामुळे सध्या नवीन व्हिडीओ स्ट्रिमींग अॅप, गेमिंग अॅपची मागणी वाढली आहे. वेब डेव्हलपमेंट क्षेत्रात अनेक संधी तयार झाल्या आहेत. तुम्हाला आवड असल्यास वेब डेवलपमेंट, अॅप डेवलपमेंट, सॉफ्टवेयर डेवलपमेंट, प्रोजेक्ट डेवलपमेंट आणि साइबर सिक्योरिटी क्षेत्रात करियरच्या चांगल्या संधी मिळतील.

(these are the best career options after coronavirus time)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT