एज्युकेशन जॉब्स

Career Tips : करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी 'या' गोष्टींवर करा फोकस

करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींवर फोकस करणे खूप महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : चांगले करिअर करणे आणि त्यात यशस्वी होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. कारण, नोकरी मिळाली म्हणजे करिअर घडले असे होत नाही. चांगले करिअर घडवण्यासाठी तुम्हाला सर्व बाजूंनी प्रयत्न करावे लागतात.

कामामध्ये तर सातत्य लागतचं शिवाय करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी खास प्रयत्न देखील करावे लागतात. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींवर फोकस करणे खूप महत्वाचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी ? चला तर मग जाणून घेऊयात.

टॅलेंट आणि कामावर विश्वास ठेवा

करिअरमध्ये तुमचे काम आणि टॅलेंट यावर तुमचा स्वत:चा पूर्ण विश्वास असणे हे फार महत्वाचे आहे. यशस्वी करिअर घडवण्यासाठी तुमच्या कामातील सातत्य आणि टॅलेंट यावर नेहमीच फोकस ठेवा. हा फोकस जर तुम्ही कायम ठेवलात तर करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही.

नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री

तुमच्या करिअरचे कोणतेही क्षेत्र असुद्या. त्यामध्ये काळानुसार बदल होत असतात. नव्या तंत्रज्ञानाची भर ही पडत असते. त्यामुळे, करिअर घडवत असताना आपल्या क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे आणि त्याप्रमाणे अपडेटेड राहणे हे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले तर, तुमच्या करिअरचा आलेख हा सतत चढता राहिल, यात काही शंका नाही.

तणावमुक्त रहा

कामातील स्ट्रेसमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा आणि नैराश्याचा देखील सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, कामाचा जास्त ताण घेणे टाळा. त्यासंदर्भात तुमच्या सहकाऱ्यांशी अथवा वरिष्ठांशी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

तुमचे काम हे हसूनखेळून आणि कोणताही अधिकचा ताण न घेता पार पाडण्याचा प्रयत्न ठेवा. तणावमुक्त राहून काम केल्याने तुम्हाला कामातील आनंद ही मिळू शकेल. यशस्वी करिअर घडवण्यासाठी तणावमुक्त राहणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, यावर ही फोकस करायला अजिबात विसरू नका.

कॉन्टॅक्टमध्ये रहा

नोकरीतील संबंधित माहितीसाठी आणि करिअरमधील नव्या विषयांची माहिती होण्यासाठी तुम्ही सतत संपर्कात राहणे महत्वाचे आहे. तुमच्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी आणि वरिष्ठांसोबत या संदर्भात चर्चा करत रहा.

सहकाऱ्यांकडून या नव्या स्किल्सबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत रहा, भेटीगाठी करत रहा. या कॉन्टॅक्टमुळे तुम्हाला तुमचे सर्कल वाढवता येईल आणि नोकरीच्या नवनवीन संधी देखील निर्माण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT