Written Exam sakal
एज्युकेशन जॉब्स

Basic Testing : तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा माध्यमांमध्ये पायाभूत चाचणी

इयत्ता तिसरी ते नववीच्या प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांची लेखी आणि तोंडी चाचणी घेतली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि दोन अशा चाचण्यांचा समावेश आहे. त्यातील पायाभूत चाचणी १० ते १२ जुलै या कालावधीत होणार आहे. ही पायाभूत चाचणी एकूण दहा माध्यमांमध्ये होणार आहे.

इयत्ता तिसरी ते नववीच्या प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांची लेखी आणि तोंडी चाचणी घेतली जाणार आहे. मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती, मूलभूत क्षमता यावर ही चाचणी आधारित असेल. शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात चाचणी आयोजित करण्याचे, तसेच लेखी परीक्षेनंतर त्याचदिवशी तोंडी परीक्षा घेण्याचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने दिले. परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी याबाबत परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.

पायाभूत चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या विद्यार्थिनिहाय प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून पुरवल्या जाणार आहेत. परीक्षेच्या दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, तसेच एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो हजर होईल त्याचदिवशी परीक्षा घेण्यात यावी.

पायाभूत चाचणीतील संपादणुकीच्या आधारे शिक्षकांनी कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांची संकलित चाचणीमध्ये संपादणूक वाढण्यास मदत होईल, अशा सूचनाही परिषदेने दिल्या आहेत.

गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, तालुका समन्वयकांनी विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून प्रश्नपत्रिका मिळाल्याची खातरजमा करून घ्यावी. तालुका समन्वयकांनी प्रश्नपत्रिका मोजूनच मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्याव्यात. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखावी.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या सांख्यिकीय माहितीनुसार प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार असल्याने त्या कमी पडल्यास किंवा छायांकित प्रती काढाव्या लागल्या तर त्याचे देयक दिले जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले. पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र येथे नोंदविण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्रामार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे आहेत, असे परिषदेने नमूद केले आहे.

पायाभूत चाचणीचा उद्देश

  • विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे

  • अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे

  • राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणमधील संपादणूक वाढविणे

  • अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्यादृष्टीने कृती कार्यक्रम तयार करणे

  • इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची

  • संपादणूक स्थिती समजण्यास मदत

चाचण्यांचा संभाव्य कालावधी

चाचणी प्रकार कालावधी

पायाभूत चाचणी - १० ते १२ जुलै

संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - १ : ऑक्टोबर शेवटचा आठवडा किंवा

नोव्हेंबर पहिला आठवडा - संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २ : एप्रिल पहिला किंवा दुसरा आठवडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT