10th 12th Exam Result esakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी, बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार; शिक्षक समन्वय संघाचा निर्णय, निकाल लांबण्याची शक्यता

बहिष्कार कायम राहिला तर दहावी, बारावीचा निकाल (10th, 12th Result) लांबण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

शासनाने तत्काळ बैठक लावून हा विषय मार्गी लावावा, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाने केले आहे.

साडवली : राज्यातील अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांनी दहावी व बारावी बोर्ड उत्तरपत्रिका तपासणीवर (10th and 12th Board Answer Sheet Check) बहिष्कार टाकला आहे. अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध संघटनांचे (Teachers Association) आंदोलन सध्या शिक्षक समन्वय संघांच्या छताखाली मुंबईत सुरू आहे. या आंदोलनाला ६० दिवस उलटून गेले तरी शासनाने मागण्या मान्य न केल्याने शिक्षक समन्वय संघाने दहावी व बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.

बहिष्कार कायम राहिला तर दहावी, बारावीचा निकाल (10th, 12th Result) लांबण्याची शक्यता आहे. शासनाने तत्काळ बैठक लावून हा विषय मार्गी लावावा, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाने केले आहे. राज्यात अंशतः अनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात विविध ठिकाणी २० टक्के, ४० टक्के, तर काही ठिकाणी ६० टक्के पगारावर शिक्षक काम करीत आहेत.

त्या शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढचा टप्पा १ जानेवारी २०२४ पासून लागू करा व उर्वरित टप्पे नैसर्गिक वाढीने दरवर्षी देण्यात यावेत, या मागणीसाठी ३ जानेवारीपासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली जात नसल्याने शिक्षकांनी बोर्ड उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

शिक्षक समन्वय संघाच्या लेटर हेडवरती राज्यभरात प्रत्येक तालुक्यात अंशतः अनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावी बोर्ड उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक, बोर्डाचे सचिव यांना दिले आहे. परिणामी उत्तरपत्रिका न तपासता, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे बोर्डात यायला सुरुवात झाली आहे.

शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी

२० वर्षांहून अधिक काळ विनावेतन काम केलेल्या शिक्षकांचे, समान काम समान वेतन या न्यायाने प्रश्न सोडवण्याची गरज होती. परंतु या गंभीर प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने अंशतः अनुदानित शिक्षकांकडून तीव्र शब्दात नाराजीचे सूर उमटत आहेत. बोर्डाच्या दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे सध्या मॉडरेटर, चीफ मॉडरेटर यांना देखील अडचणी येत आहेत. मॉडरेटर सभेला कुणी उपस्थित न राहिल्याने एकूणच उत्तरपत्रिका तपासणीला राज्यात ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT