PhD, NET, SET esakal
एज्युकेशन जॉब्स

PhD, NET, SET उमेदवारांना नोकरीची संधी; यूजीसीनं सुरु केलं 'जॉब पोर्टल'

सकाळ डिजिटल टीम

सातारा : पीएचडी, नेट व एसईटी (PhD, NET, SET) परीक्षा पात्र उमेदवारांना 'नोकरी'साठी शोध घेण्याची आता काहीच गरज नाही. कारण, आता यूजीसीने खास तरुणांसाठी एक नवीन शैक्षणिक जॉब पोर्टल सुरू केले आहे. त्याअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (एसईटी) असे विभागवार 'जॉब पोर्टल' (Job Portal) सुरू करण्यात आलेय. दरम्यान, या पोर्टलवर उमेदवाराने आपले प्रोफाइल तयार करणे अपेक्षित असून त्यानंतर, विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील (College and Universities) रिक्त पदांचा तपशील आपल्याला सहजरित्या मिळू शकणार आहे. (UGC Has Set Up An Academic Job Portal For Phd Net And State Eligibility Test Set Qualified Candidates)

पीएचडी, नेट व एसईटी (PhD, NET, SET) परीक्षा पात्र उमेदवारांना 'नोकरी'साठी शोध घेण्याची आता काहीच गरज नाही.

यूजीसीच्या म्हणण्यानुसार, पात्र उमेदवारांना या पोर्टलवर विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक नोकरीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. शिवाय त्यांचे प्रोफाइलही तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपल्याला या पोर्टलवर योग्य माहिती मिळू शकेल. या पोर्टलच्या माध्यमातून, शैक्षणिक संस्था उपलब्ध उमेदवारांचा शोध घेऊ शकतात आणि नोकरीच्या रिक्त जागा पाहून उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त, उपलब्ध नोकऱ्यांमध्ये सुधारणा करणे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात बदल करण्याचा आयोगाचा मानस आहे. अकाउंट्स, सिक्युरिटी, हेल्थ, लायब्ररी आणि इतर विभाग यांसारख्या नॉन टीचिंग जॉबमध्ये प्रशासकीय भूमिकेसह नोकर्‍या असतील. शिवाय या नोकर्‍यांची माहिती आता पोर्टलवर देखील अपलोड केली जाणार आहे.

याशिवाय अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (university Grants Commission UGC) देशभरातील 38 विद्यापीठांना ऑनलाइन पदवी कार्यक्रमांना मान्यता दिली असून यादी जाहीर झाल्यानंतर, आता ही विद्यापीठे यूजीसीची परवानगी न घेताही फुलफ्लेज ऑनलाइन कार्यक्रम सुरू करू शकतात. यूजीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार, ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम देणाऱ्या विद्यापीठांत 15 डीम्ड विद्यापीठे, 13 राज्य विद्यापीठे आणि तीन केंद्रीय विद्यापीठे आहेत. दरम्यान, याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

UGC Has Set Up An Academic Job Portal For Phd Net And State Eligibility Test Set Qualified Candidates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT