कोणत्या विषयाचा अभ्यास हाती घ्यावा हे अनेक वेळा नक्की करता येत नाही. त्यामुळेच सहजपणे आपण अभ्यासातील सोप्या आणि सहज घटकांकडेच वारंवार लक्ष देतो, त्यातच आपला जास्त वेळ घालवतो.
कोणत्या विषयाचा अभ्यास हाती घ्यावा हे अनेक वेळा नक्की करता येत नाही. त्यामुळेच सहजपणे आपण अभ्यासातील सोप्या आणि सहज घटकांकडेच वारंवार लक्ष देतो, त्यातच आपला जास्त वेळ घालवतो. जे विनासायास जमते आहे, अशाच गोष्टी सारख्या करत रहाण्याकडे आपला जास्त कल असतो. खरंतर जे येते आहे, कळले आहे तेच परत परत करत बसण्यामध्ये काहीच उपलब्धी नसते. येणाऱ्या गोष्टी करत बसण्यामध्येच आपल्याला जास्त आनंद आणि समाधान वाटत असते. त्यामुळे तोच घटक जास्त पक्का होत जातो. अशा गोष्टींचा आपल्याला विसरही सहजासहजी पडत नाही.
पर्यायाने अवघड आणि आव्हानात्मक अशा घटकांकडे आपल्याला जमत नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो. असा भाग अभ्यासातून वगळण्याकडे आपला कल वाढायला लागतो. मग अवघड हे कायमच अवघड वाटायला लागते. म्हणूनच अभ्यासाच्या घटकाची निवड करताना आपल्याला अवघड वाटणाऱ्या भागाची सुरुवातीला निवड करावी. त्या संकल्पनेतील नेमके अवघड काय आहे याचा शोध घेणे आवश्यक असते. अनेक वेळा एखादी संकल्पना आपल्याला अवघड जाते, कारण त्यासाठी लागणारी पायाभूत संकल्पना किंवा पूर्वतयारी, झालेली नसते. म्हणजेच भागाकार पक्के करण्यासाठी पाढे पक्के असणे आवश्यक आहे. त्या मुळाशी गेलात तरच तुम्हाला पुढचा अभ्यास करता येईल. अवघड बाबींच्या मुळाशी जाऊन अभ्यास केल्यास अवघड ते सोपे जाऊ लागते.
अवघड गोष्टींना अभ्यासात प्राधान्य दिले तरच त्या गोष्टी सोप्या व्हायला लागतील. त्यापासून दूर जाण्यापेक्षा त्यांना जवळ करणे आवश्यक आहे. एखादी संकल्पना शिकविताना आपण वर्गात गैरहजर असल्यास ती समजणे अवघड जाते. म्हणून शिक्षकांकडून ती समजून घेणे जास्त श्रेयस्कर होऊ शकते. काही तरी समजलेले नसते म्हणूनच विषयातील क्लिष्टता वाढायला लागते. आपल्याला नेमके काय समजलेले नाही हे जाणून घेउन एकदा ते कळाले म्हणजे काहीच अवघड रहात नाही.
अभ्यास करण्याची पद्धती बदलली तरी अवघड गोष्टी सोप्या वाटायला लागतात. अभ्यासात तोच तोचपणा यायला लागल्यास अभ्यास अवघड वाटायला सुरुवात होते. आपण काही काळ लिहीत असाल तर बदल करा तोच विषय वाचायला घ्या. त्या विषयाबद्दल कुणाशीतरी बोलायला लागा, चर्चा करायला लागा. असा बदल आपल्याला संकल्पना सोपी व्हायला उपयुक्त ठरू शकतात. प्रयत्न करत राहिल्यास कोणतीही गोष्ट अवघड राहणार नाही. ती सहज सायास होईल. तर मग आता सुरुवातीला अभ्यास कशाचा करायचा हे समजले ना!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.