universities do not send action taken report on non compliance with naac evaluation esakal
एज्युकेशन जॉब्स

NAAC : ‘नॅक मूल्यांकन’ न करणाऱ्यांवर काय कारवाई केली?

उच्च शिक्षण संचालकांची विद्यापीठांना विचारणा; अहवाल सादर करण्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा विस्तृत अहवाल आता राज्यातील सर्व विद्यापीठांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. ७) उच्च शिक्षण संचालनालयास सादर करावा लागणार आहे.

‘नॅक मूल्यांकन’ न करणाऱ्या महाविद्यालयांच्या यादीसह संलग्नता काढण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील मागविण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या प्रारंभापासून नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन केलेले नाही, अशा महाविद्यालयांबाबत संलग्नता काढून घेण्याची कार्यवाही करावी आणि कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असा आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने यापूर्वी दिला होता.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार ही कार्यवाही करावी, अशी सूचना दिली होती, परंतु राज्यातील विद्यापीठांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर डॉ. देवळाणकर यांनी पुन्हा सर्व विद्यापीठांना कार्यवाहीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल येत्या दोन दिवसांत पाठविण्यास सांगितले आहे.

संलग्नता काढून घेतलेल्या महाविद्यालयांची यादी शिक्षण विभागाने विद्यापीठांकडून मागविली आहे. या संदर्भात उच्च शिक्षण विभागाने २३ मे आणि ९ ऑगस्ट रोजी सर्व विद्यापीठांना नॅक मूल्याकंनाबाबत कळविले होते, पण तरीही विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे.

काही विद्यापीठांनी यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यात केवळ कार्यवाही सुरू असून, लवकरच अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे, परंतु संबंधित विद्यापीठांना कार्यवाहीची वस्तुनिष्ठ माहिती नमूद करावी लागणार आहे. महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात विद्यापीठांनी त्या महाविद्यालयांच्या नावाच्या यादीसह केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT